सकल हिंदू समाजाच्या वतीने अभिवादन; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
खडकी | प्रतिनिधी : दी. 1 जून 2026 स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 143 व्या जयंतीनिमित्त खडकी येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने प्रतिमा पूजन व अभिवादन कार्यक्रम नुकताच उत्साहात संपन्न झाला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सावरकर यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात दिलेले योगदान, राष्ट्रभक्तीची प्रेरणा आणि सामाजिक कार्य यांचा यावेळी गौरवपूर्वक उल्लेख करण्यात आला.
कार्यक्रमास खडकी कॅन्टोन्मेंटचे उपाध्यक्ष अभय सावंत, स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अनिल कांबळे, द औंध सोशल फाउंडेशनचे सचिव गणेश नाईकरे, भाजप मंडळ अध्यक्ष शाम काची, माजी मंडळ अध्यक्ष धर्मेश शहा, युवा उद्योजक व भाजप कार्यकर्ते अमित मानकर, भाजप खडकी मंडळ सरचिटणीस चिराग शहा, भाजप खडकी युवा सरचिटणीस प्रथम अंगिर अजित पवार, युवा मंडळ अध्यक्ष योगेश करनूर, सुशील गरसुंद, शहीद इनामदार, चेतन सत्तूर यांच्यासह मोठ्या संख्येने हिंदू बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन सकल हिंदू समाज, खडकी यांच्या वतीने करण्यात आले.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏



















