Homeपुणेहिंदू मोची समाजातर्फे खासदार ज्योती वाघमारे यांचा भव्य सत्कार

हिंदू मोची समाजातर्फे खासदार ज्योती वाघमारे यांचा भव्य सत्कार

पुणे | प्रतिनिधी : दि. 18 मे 2026                  नुकत्याच राज्यसभेच्या खासदारपदी निवड झालेल्या ज्योती वाघमारे यांचा हिंदू मोची पुणे शहर समाजाच्या वतीने भव्य सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला. हा मेळावा येरवडा येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह येथे पार पडला.

कार्यक्रमाचे उदघाटन उच्च व तंत्रज्ञान शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी समाजाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
सत्काराला उत्तर देताना खासदार ज्योती वाघमारे यांनी सर्वसामान्य कुटुंबातून राज्यसभेपर्यंतच्या आपल्या प्रवासाचा उलगडा केला. “गाईच्या दुधाला किंमत असते, म्हशीच्या दुधाला किंमत असते; मात्र आईच्या दुधाला किंमत नसते,” अशी भावनिक उपमा देत त्यांनी समाजाच्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या प्रभावी भाषणाने उपस्थितांची मने जिंकली.
या मेळाव्याच्या निमित्ताने समाजातर्फे आयोजित करण्यात आलेल्या आठवडाभराच्या क्रीडा महोत्सवातील विजेत्या संघांना पारितोषिक वितरण करण्यात आले तसेच सहभागी खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यासोबतच वधू-वर परिचय मेळावा आणि महिलांसाठी आयोजित “होम मिनिस्टर” कार्यक्रमालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी सोलापूरचे नवनिर्वाचित नगरसेवक नर्सिंग असादे यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास पुणे महापालिका नगरसेविका शितल सावंत, मृणाली कांबळे, खडकी छावणी परिषदेचे नामनिर्देशित सदस्य अभय सावंत तसेच माजी सदस्य कमलेश चासकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत हिंदू मोची समाजाचे पुणे शहर अध्यक्ष शिरीष रोच यांनी केले तर सूत्रसंचालन सेक्रेटरी विकास गडपल्लू यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किशोर धडेलु, किशोर गोरेल, शरद रोच, श्रीनिवास गोरेल, तानाजी पलेलू, विनोद पिंजरेलू, मयूर संगेवार, जयराज लिंगवत, कैलास गोरेल, महेश बटेल्लू, अरविंद इंद्रोल, संजय इदारू, विनोद बागेल्लू, निलेश भोसले आणि पौर्णिमा भोसले यांनी विशेष परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सारसबाग बंद निर्णयावर मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनचा आक्षेप, प्रशासनाने फेरविचार करावा अशी मागणी

“सुरक्षेच्या कारणांचा आधार घेत विशिष्ट समाजाला लक्ष्य केल्याचा संशय” — डॉ. फरहा शेख यांचे निवेदन बोपोडी | प्रतिनिधी : दी. 27 मे 2026 बकरी ईदनंतर पारंपरिक...

खडकी छावणीतील हातगाडी परवाना धारकांना मुदतवाढ द्या, सारथी सोशल फाउंडेशनची मागणी

कागदपत्रे अपूर्ण राहिल्याने अनेक हातगाडी व्यावसायिक अडचणीत; खडकी छावणी परिषदेला निवेदन सादर खडकी | प्रतिनिधी : दी. 26 मे 2026           ...

पीसीएमसीचा अतिक्रमणधारकांना इशारा; १५ दिवसांत पदपथ मोकळे करा, अन्यथा कठोर कारवाई

नागरिकांच्या सुरक्षित व विनाअडथळा प्रवासासाठी महापालिकेची मोहीम तीव्र; क्षेत्रीय कार्यालयनिहाय कारवाईचा आढावा पिंपरी | प्रतिनिधी : दि. 26 मे 2026           ...

पुण्यात मुस्लिम समाजाची गाईला ‘राष्ट्रीय प्राणी’ घोषित करण्याची मागणी

सामाजिक सलोखा, शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पुणे | प्रतिनिधी : दि. 26 मे 2026               ...

पुणे शहर काँग्रेसच्या नवनिर्वाचित शहराध्यक्षांचा जनहित जागृती मंचतर्फे सत्कार

डॉ. विश्वजीत कदम यांना शॉल व संविधान पुस्तक भेट देत मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव बोपोडी | प्रतिनिधी : दि. 23 मे 2026         ...

error: Content is protected !!