पुणे | प्रतिनिधी : दि. 18 मे 2026 पेट्रोल-डिझेलच्या सतत वाढणाऱ्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून, केंद्र सरकारविरोधात देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, पुणे शहरच्या वतीने आज पुणे महानगरपालिकेवर बैलगाडी व टांगा मोर्चा काढून अनोखे आंदोलन करण्यात आले.

शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत इंधन दरवाढीचा निषेध व्यक्त केला. वाढत्या पेट्रोल-डिझेल दरांमुळे महागाईत मोठी वाढ होत असून सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
दरवाढ तात्काळ मागे घेण्यात आली नाही, तर यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, पुणे शहरच्या वतीने देण्यात आला.
यावेळी गटनेते काका चव्हाण, महिला अध्यक्ष स्वाती पोकळे, नगरसेवक गफुर पठाण, नगरसेविका अनिता इंगळे, रविंद्र माळवदकर, दीपक जगताप, अजिंक्य पालकर, हर्षद जाधव, प्रवीण तुपे, मकरंद देशमुख, वंदना मोडक, दिलशाद अत्तार, उर्मिला गुंड, जयश्री आदमाने, मेघा सातव तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏






















