Homeपुणेनीट पेपरफुटीप्रकरणी पुण्यात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे आंदोलन; केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी

नीट पेपरफुटीप्रकरणी पुण्यात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे आंदोलन; केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी

मुख्य आरोपींना अटक होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार” — श्रीकांत पाटील

पुणे | प्रतिनिधी : दि. 13 मे 2026
नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप करत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पुण्यात आंदोलन करण्यात आले. पुणे शहरातील बालगंधर्व रंगमंदिर चौकात झालेल्या या आंदोलनात केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे तसेच पुणे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी केले. नीट पेपरफुटी प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली असली तरी या घटनेमुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले असून विद्यार्थी वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे म्हणाले की, “मागील १२ वर्षांपासून केंद्र आणि राज्य सरकार विद्यार्थी वर्गाच्या हिताचे ठोस निर्णय घेण्यात अपयशी ठरले आहे. नीटसारख्या महत्त्वाच्या परीक्षेचा पेपर फुटणे ही अत्यंत गंभीर बाब असून यामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाला आहे. या प्रकरणाला सरकार जबाबदार असून मुख्य आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी.”
पुणे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील म्हणाले, “केंद्र सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जोपर्यंत या प्रकरणातील मुख्य आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील. भविष्यात नीटसह इतर कोणत्याही परीक्षांचे पेपर लिक होणार नाहीत यासाठी सरकारने विशेष उपाययोजना कराव्यात.”
या आंदोलनात विद्यार्थी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!