Homeपुणेमहिला व युवतींसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून शासकीय शहरी योजनांचे मार्गदर्शन शिबिर संपन्न

महिला व युवतींसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून शासकीय शहरी योजनांचे मार्गदर्शन शिबिर संपन्न

पुणे | प्रतिनिधी : दि. 10 मे 2026
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय येथे महिला, युवती, पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी शासकीय शहरी योजनांविषयी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विविध शासकीय योजनांची माहिती तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावी आणि कार्यकर्त्यांना त्यांच्या प्रभागात काम करताना त्याचा उपयोग व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दिवंगत नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी पुणे महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते. त्यांनी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून विविध शहरी योजनांची सविस्तर माहिती महिला व युवतींना दिली.

या मार्गदर्शन शिबिरामुळे कार्यकर्त्यांना आपल्या वार्डमध्ये नागरिकांसाठी काम करताना निश्चितच मोठी मदत होणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
या उपक्रमाचे आयोजन पुण्याचे अध्यक्ष सुनील टिंगरे, शुभाष जगताप, पुणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते ॲड. निलेश निकम, नगरसेवक राकेश कामठे, शिवाजीनगर अध्यक्ष अभिषेक बोके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. युवती कार्याध्यक्ष अमृता रानवडे व युवती उपाध्यक्ष ऐश्वर्या राठोड (चोपडे) यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाची धुरा सांभाळली.
यावेळी महिला पदाधिकारी, युवती, नगरसेवक, कार्यकर्ते, पालिकेचे अधिकारी तसेच विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सारसबाग बंद निर्णयावर मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनचा आक्षेप, प्रशासनाने फेरविचार करावा अशी मागणी

“सुरक्षेच्या कारणांचा आधार घेत विशिष्ट समाजाला लक्ष्य केल्याचा संशय” — डॉ. फरहा शेख यांचे निवेदन बोपोडी | प्रतिनिधी : दी. 27 मे 2026 बकरी ईदनंतर पारंपरिक...

खडकी छावणीतील हातगाडी परवाना धारकांना मुदतवाढ द्या, सारथी सोशल फाउंडेशनची मागणी

कागदपत्रे अपूर्ण राहिल्याने अनेक हातगाडी व्यावसायिक अडचणीत; खडकी छावणी परिषदेला निवेदन सादर खडकी | प्रतिनिधी : दी. 26 मे 2026           ...

पीसीएमसीचा अतिक्रमणधारकांना इशारा; १५ दिवसांत पदपथ मोकळे करा, अन्यथा कठोर कारवाई

नागरिकांच्या सुरक्षित व विनाअडथळा प्रवासासाठी महापालिकेची मोहीम तीव्र; क्षेत्रीय कार्यालयनिहाय कारवाईचा आढावा पिंपरी | प्रतिनिधी : दि. 26 मे 2026           ...

पुण्यात मुस्लिम समाजाची गाईला ‘राष्ट्रीय प्राणी’ घोषित करण्याची मागणी

सामाजिक सलोखा, शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पुणे | प्रतिनिधी : दि. 26 मे 2026               ...

पुणे शहर काँग्रेसच्या नवनिर्वाचित शहराध्यक्षांचा जनहित जागृती मंचतर्फे सत्कार

डॉ. विश्वजीत कदम यांना शॉल व संविधान पुस्तक भेट देत मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव बोपोडी | प्रतिनिधी : दि. 23 मे 2026         ...

error: Content is protected !!