महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग उर्फ सतीशजी डागोर यांची उपस्थिती; दापोडी कार्यशाळेतील प्रश्न राजेश काकडे यांनी ठामपणे मांडले
पुणे | प्रतिनिधी : दि. ६ मार्च २०२६
मुंबई येथील मुंबई सेंट्रल येथे काल महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील एस.टी. महामंडळातील सफाई कर्मचारी बांधवांचे विविध प्रलंबित प्रश्न, शासनाच्या धोरणांमुळे मिळणाऱ्या सवलती तसेच वारसा हक्कासंदर्भातील विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीस राज्यभरातील एस.टी. महामंडळाचे सर्व व्यवस्थापक व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. विशेष मार्गदर्शनासाठी नागपूर येथून महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग उर्फ सतीश डागोर हे विशेष उपस्थित होते.
बैठकीत पुणे जिल्ह्यातील BSS चे अध्यक्ष राजेश कमलदास काकडे यांनाही उपस्थित राहण्याची संधी मिळाली. यावेळी त्यांनी पुणे विभागातील, विशेषतः दापोडी कार्यशाळेतील सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न ठामपणे मांडले.
या प्रश्नांची दखल घेत डागोर साहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देत सफाई कर्मचाऱ्यांचे सर्व प्रश्न १५ दिवसांच्या आत मार्गी लावावेत, असे सांगितले. तसेच बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत १०० टक्के कार्यवाहीचे आश्वासन दिले. दापोडी कार्यशाळेशी संबंधित विषय तात्काळ नोंदवून पुढील कार्यवाहीसाठी मार्गी लावण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
यावेळी राजेश काकडे यांनी महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग उर्फ सतीशजी डागोर यांचे आभार मानत त्यांच्या नेतृत्वामुळे सफाई कर्मचारी बांधवांच्या न्याय हक्कासाठी मोठी ताकद मिळत असल्याचे सांगितले.
“सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान – आमचा अभिमान” असे म्हणत त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी पुढेही लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏






















