Homeपिंपरी चिंचवडपिंपरी-चिंचवड महापालिकेवर फेरीवाला हॉकर्स महासंघाचा ११ मार्चला महामोर्चा

पिंपरी-चिंचवड महापालिकेवर फेरीवाला हॉकर्स महासंघाचा ११ मार्चला महामोर्चा

परवाने, पुनर्वसन आणि हॉकर्स झोनसह विविध मागण्यांसाठी आंदोलन;  पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून महापालिकेपर्यंत मोर्चा

पिंपरी | प्रतिनिधी  : दि. १० मार्च २०२६
पथविक्रेते, हातगाडी, टपरी तसेच विविध लघु व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांच्या मागण्यांसाठी फेरीवाला हॉकर्स महासंघ, महाराष्ट्र यांच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर बुधवारी दि. ११ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

हातगाडी-टपरीधारकांचा इशारा : प्रश्न सुटले नाहीत तर आंदोलन तीव्र होणार

हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून निघून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर धडकणार असून या मोर्चाचे नेतृत्व प्रल्हाद कांबळे (कामगार नेते) करणार आहेत.
फेरीवाल्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा महामोर्चा काढण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले.
प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे :
पात्र लाभार्थींना १४०० रुपयांत परवाना व ओळखपत्र देण्यात यावे.
१४०० रुपयांची नोंदणी शुल्क बंद केले असल्यास ती पुन्हा सुरू करावी.
पथकांकडून होणाऱ्या कारवाईत वाद झाल्यास गुन्हे दाखल करू नयेत.
ज्या ठिकाणी फेरीवाल्यांचे गाळे काढण्यात आले आहेत तेथे पुनर्वसन करावे.
“पथविक्रेता (उपजीविका संरक्षण व पथविक्रेता) महाराष्ट्र योजना २०१७” कायद्याची अंमलबजावणी करावी.
पथारी धारकांना कामाच्या ठिकाणी Shot उपलब्ध करून द्यावी.
शहरात सिटी हॉकर्स झोन ला प्राधान्य देण्यात यावे.
कारवाईत जप्त केलेल्या हातगाड्या, टपऱ्या व माल दुसऱ्या दिवशी परत देण्यात यावा.
या मोर्चात मोठ्या संख्येने फेरीवाले, हातगाडी चालक, टपरीधारक तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!