Homeपिंपरी चिंचवडइराण–इस्रायल युद्धाचा बहाणा करून दिघी त काही दुकानदारांकडून दरवाढ? नागरिकांना वेठीस धरणे...

इराण–इस्रायल युद्धाचा बहाणा करून दिघी त काही दुकानदारांकडून दरवाढ? नागरिकांना वेठीस धरणे थांबवा – सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर पोलकम यांची मागणी

वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांना निवेदन; इस्त्री, भाजीपाला व इतर छोट्या व्यवसायिकांनी विनाकारण भाव वाढवू नयेत, पोलीसांकडून अनाउन्समेंट करण्याची मागणी

पिंपरी | प्रतिनिधी : दि. ११ मार्च २०२६।                सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यातील युद्धाची चर्चा सुरू असताना, त्याचा कोणताही थेट संबंध नसतानाही दिघी परिसरात काही लहान-मोठ्या व्यावसायिकांकडून वस्तू आणि सेवांचे दर वाढवले जात असल्याची तक्रार नागरिकांकडून पुढे येत आहे. विशेषतः इस्त्री सेवा देणारे, भाजीपाला विक्रेते तसेच इतर काही छोट्या व्यवसायिकांकडून अचानक दरवाढ केल्यामुळे स्थानिक नागरिकांना आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगितले जात आहे.

याबाबत सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकार कार्यकर्ते प्रभाकर उर्फ बबलू अशोक पोलकम यांनी दिघी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्याकडे नम्र विनंती केली आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा स्थानिक किरकोळ व्यवसायांशी कोणताही संबंध नसताना काही जण त्याचा आधार घेऊन दरवाढ करत असल्यास त्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
पोलकम यांनी सांगितले की, “दिघी परिसरातील सामान्य नागरिक आधीच महागाईमुळे त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत इस्त्री सेवा, भाजीपाला किंवा इतर रोजच्या गरजेच्या वस्तूंचे दर विनाकारण वाढवून जनतेला वेठीस धरणे योग्य नाही. कोणत्याही कारणाशिवाय दरवाढ केली तर त्याचा फटका थेट सामान्य कुटुंबांना बसतो.”
यासाठी पोलिसांनी परिसरात गस्ती दरम्यान अनाउन्समेंट करून व्यापाऱ्यांना सूचना द्याव्यात की, कोणताही संबंध नसलेल्या वस्तूंचे दर मनमानी पद्धतीने वाढवू नयेत, तसेच नागरिकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशीही त्यांनी मागणी केली आहे.
दिघी परिसरात शांतता आणि पारदर्शक व्यवहार टिकून राहावेत, तसेच नागरिकांना विनाकारण आर्थिक फटका बसू नये यासाठी प्रशासनाने योग्य ती दखल घ्यावी, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!