Homeपुणेअतिक्रमण कारवाईत जप्त केलेला प्लास्टिक माल परत द्या; अन्यथा आंदोलनाचा इशारा –...

अतिक्रमण कारवाईत जप्त केलेला प्लास्टिक माल परत द्या; अन्यथा आंदोलनाचा इशारा – मनसेची महापालिकेला नोटीस

अतिक्रमण कारवाई की मनमानी? जप्त प्लास्टिक मालावरून मनसे आक्रमक!

पुणे | प्रतिनिधी : दि.३ मार्च २०२६
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, पुणे शहराच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन देत अतिक्रमण कारवाईदरम्यान जप्त केलेला प्लास्टिक माल तात्काळ परत करण्याची मागणी करण्यात आली आहे.
भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या ७३२, शुक्रवार पेठ येथील श्री मंगल प्लास्टिक  दुकानावर दिनांक ८ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास कारवाई करण्यात आली. या कारवाईत प्लास्टिकचे टेबल, स्टूल, स्पेअर जाळी, ड्राय ड्रम, फोल्डिंग स्टूल, प्लास्टिकचे कॅरेट, रॅक तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

मनसेच्या निवेदनानुसार, कारवाईदरम्यान जप्त केलेला माल नेमका कुठे नेण्यात आला याची माहिती मिळाली नसून संबंधित अधिकाऱ्यांकडून स्पष्ट उत्तर दिले जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्थानिक दुकानदार व मनसे पदाधिकारी संजय तोडमल यांनी याबाबत तक्रार नोंदवली असून, जप्त केलेला माल दोन दिवसांत परत न केल्यास मनसे स्टाईल आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष सुहास निम्हण यांनी या निवेदनावर स्वाक्षरी केली असून, “मराठी माणसाला न्याय मिळाला नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल,” असे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, अतिक्रमण कारवाईतील जप्त मालाबाबत पालिकेची अधिकृत भूमिका काय, याकडे व्यापारी व नागरिकांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सारसबाग बंद निर्णयावर मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनचा आक्षेप, प्रशासनाने फेरविचार करावा अशी मागणी

“सुरक्षेच्या कारणांचा आधार घेत विशिष्ट समाजाला लक्ष्य केल्याचा संशय” — डॉ. फरहा शेख यांचे निवेदन बोपोडी | प्रतिनिधी : दी. 27 मे 2026 बकरी ईदनंतर पारंपरिक...

खडकी छावणीतील हातगाडी परवाना धारकांना मुदतवाढ द्या, सारथी सोशल फाउंडेशनची मागणी

कागदपत्रे अपूर्ण राहिल्याने अनेक हातगाडी व्यावसायिक अडचणीत; खडकी छावणी परिषदेला निवेदन सादर खडकी | प्रतिनिधी : दी. 26 मे 2026           ...

पीसीएमसीचा अतिक्रमणधारकांना इशारा; १५ दिवसांत पदपथ मोकळे करा, अन्यथा कठोर कारवाई

नागरिकांच्या सुरक्षित व विनाअडथळा प्रवासासाठी महापालिकेची मोहीम तीव्र; क्षेत्रीय कार्यालयनिहाय कारवाईचा आढावा पिंपरी | प्रतिनिधी : दि. 26 मे 2026           ...

पुण्यात मुस्लिम समाजाची गाईला ‘राष्ट्रीय प्राणी’ घोषित करण्याची मागणी

सामाजिक सलोखा, शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पुणे | प्रतिनिधी : दि. 26 मे 2026               ...

पुणे शहर काँग्रेसच्या नवनिर्वाचित शहराध्यक्षांचा जनहित जागृती मंचतर्फे सत्कार

डॉ. विश्वजीत कदम यांना शॉल व संविधान पुस्तक भेट देत मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव बोपोडी | प्रतिनिधी : दि. 23 मे 2026         ...

error: Content is protected !!