पुणे | प्रतिनिधी : दि. १९ फेब्रुवारी २०२६
शिवजयंतीच्या निमित्ताने दुर्योधन भापकर स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने रेंज हिल्स, खडकी (पुणे) येथे दिनांक १४ व १५ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेली जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धा उत्साहात व दिमाखात संपन्न झाली. दोन दिवस रंगलेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध भागांतून आलेल्या खेळाडूंनी दमदार खेळाचे प्रदर्शन करत प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
स्पर्धेचे उद्घाटन उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या हस्ते झाले. पारितोषिक वितरण समारंभ क्रीडा अधिकारी रेशमा शिंदे यांच्या हस्ते पार पडला.
कार्यक्रमास रोटरी क्लबचे अध्यक्ष रामदास जैन, नगरसेवक सनी निम्हण, दत्ता बहिरट, सुधीर आल्हाट, नगरसेविका सपना छाजेड, कार्तिकी हिवरकर , माया तांबे तसेच संदीप कोकाटे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय बॉक्सर विकास जाधव व फेरोज खान यांनी विशेष सहकार्य केले.
■ पुरुष गट – पारितोषिक विजेते
बेस्ट बॉक्सर: ऋषिकेश चंडालिया (दुर्योधन भापकर स्पोर्ट्स फाउंडेशन)
■ बेस्ट चॅलेंजर: आयुष ढाले (युवा विकास मंच)
■ मोस्ट प्रोमिसिंग बॉक्सर: संकेत सिंग (बी.एम.एस.ए.)
■ महिला गट – पारितोषिक विजेत्या
■ बेस्ट बॉक्सर: परिणीदी आकाश बिवाल (स्टार बॉक्सिंग अकॅडमी)
■ बेस्ट चॅलेंजर बॉक्सर: आरुषी खत्री (निलेश बॉक्सिंग अकॅडमी, मोशी)
■ मोस्ट प्रोमिसिंग बॉक्सर: अगत्या जगदाळे (एस.एस.बी.सी.)
कार्यक्रमाच्या शेवटी दुर्योधन भापकर स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष दुर्योधन भापकर यांनी उपस्थित सर्व मान्यवर, प्रशिक्षक, खेळाडू व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.
या स्पर्धेचे नियोजन व संयोजन प्रशिक्षक निलेश खुडे यांनी प्रभावीपणे पार पाडले.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏






















