पुणे |  प्रतिनिधी : दि. २१ फेब्रुवारी २०२६
पुणे रेल्वे स्टेशन परिसरात नागरिकांची अव्वाच्या सव्वा दराने लूट करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या बोगस रिक्षाचालकांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, तसेच अधिकृत प्रीपेड बूथवर नियमाने व्यवसाय करणाऱ्या रिक्षाचालकांना संरक्षण द्यावे, अशी ठाम मागणी आज ‘बघतोय रिक्षावाला’ संघटनेच्या वतीने करण्यात आली.

यासंदर्भात लष्कर विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त संगीता शिंदे अल्फोन्सो यांना बंडगार्डन पोलिस ठाणे येथे निवेदन देण्यात आले.
काय आहे तक्रार ?
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की,
पुणे स्टेशनवरील प्रीपेड रिक्षा बूथवर सरकारी नियमांनुसार प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या रिक्षाचालकांना काही गुंड प्रवृत्तीचे २० ते २५ बोगस रिक्षाचालक शिवीगाळ करून परिसरातून हाकलून देतात. हेच बोगस रिक्षाचालक प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा दराने भाडे आकारून आर्थिक पिळवणूक करत आहेत.
यामुळे एकीकडे प्रामाणिक रिक्षाचालकांचे नुकसान होत असून दुसरीकडे नागरिकांचीही सर्रास फसवणूक होत असल्याचा आरोप करण्यात आला.
◆ ‘हप्ता देतो’ अशी उघड भाषा?
सदर बोगस रिक्षाचालक स्थानिक पोलिसांना ‘हप्ता’ देत असल्याची उघडपणे भाषा वापरत असल्याचे वृत्त एका दैनिकात प्रसिद्ध झाले असल्याचा उल्लेखही निवेदनात करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
याप्रसंगी  डॉ. केशव नाना क्षीरसागर
अध्यक्ष, महाराष्ट्र कामगार सभा  तसेच  मोठ्या संख्येने रिक्षाचालक उपस्थित होते.

https://youtu.be/uQP_r9jE0O0?si=rT93gfz6G-nBAfdp
या संदर्भात प्रशासनाने तातडीने पावले उचलून पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील अनधिकृत रिक्षा वाहतूक व लूटमार थांबवावी, अशी मागणी जोर धरत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!