Homeक्राईमखडकी पोलीस स्टेशन हद्दीत ‘ऑपरेशन अलख निरंजन’ अंतर्गत गांजा निर्मिती रॅकेट उद्ध्वस्त

खडकी पोलीस स्टेशन हद्दीत ‘ऑपरेशन अलख निरंजन’ अंतर्गत गांजा निर्मिती रॅकेट उद्ध्वस्त

 सुमारे 3 कोटी 46 लाखांचा अमली पदार्थ जप्त; 5 आरोपी अटकेत              

खडकी / प्रतिनिधी : दि. २० डिसेंबर २०२५      पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ‘ऑपरेशन अलख निरंजन’ या विशेष मोहिमेअंतर्गत खडकी पोलीस स्टेशन हद्दीत नोंद असलेल्या एका गुन्ह्यात गांजा तयार व वितरित करणाऱ्या संघटित रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ३ कोटी ४६ लाख रुपये किमतीचा गांजा व इतर अमली पदार्थ जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार, खडकी पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या एका गुन्ह्याच्या तपासादरम्यान या रॅकेटचे धागेदोरे उघडकीस आले. पुढील तपासात आरोपींनी पिंपरी-चिंचवड परिसरातील भाड्याच्या फ्लॅटमध्ये अत्याधुनिक पद्धतीने गांजा निर्मितीचे युनिट उभारल्याचे निष्पन्न झाले. या ठिकाणी गांजा लागवड, प्रक्रिया आणि वितरणासाठी आवश्यक साहित्य आढळून आले.
या प्रकरणात पोलिसांनी पाच संशयित आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून गांजा, इतर अमली पदार्थ, इलेक्ट्रॉनिक उपकरणे तसेच रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. सर्व आरोपींविरोधात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (NDPS Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या रॅकेटचे संपर्क पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई व गोवा अशा विविध ठिकाणांशी जोडलेले असल्याचा संशय आहे. या प्रकरणात आणखी आरोपी सहभागी आहेत का, तसेच आर्थिक व्यवहार व वितरण साखळी कशी कार्यरत होती, याचा तपास सुरू आहे.
दरम्यान, जप्त करण्यात आलेला सर्व मुद्देमाल न्यायालयीन आदेशानुसार सुरक्षित ठेवण्यात आला असून, या कारवाईमुळे शहरातील अमली पदार्थांच्या बेकायदेशीर व्यवहाराला मोठा आघात बसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून, पुढील कारवाई तपासाअंती करण्यात येणार आहे, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!