पुणे पीसीएमसी न्यूज 24: खडकी प्रतिनिधी- लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड च्या मुख्य सभागृहात खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड व खडकी मातंग विकास संस्थेच्या वतीने संयुक्त कार्यक्रम घेण्यात आला
यावेळी सर्वप्रथम लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तदनंतर ‘साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे उर्फ तुकाराम साठे यांच्या ‘साहित्य एक प्रवास गाथा’ ‘ या विषयावर प्राध्यापक सचिन पवार यांनी प्रबोधनात्मक व्याख्यान दिले. दुसरे व्याख्याते प्राध्यापक मोहन शिंदे यांनीही आण्णाभाऊ साठे याच्या स्मृती ना उजाळा दिला.
याप्रसंगी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ( CEO ) मीनाक्षी लोहिया, बोर्डाचे नामनिर्देशित सदस्य अभय सावंत , माजी सदस्य कमलेश चासकर बोर्डाचे आरोग्य अधीक्षक शिरीष पत्की , कार्यालयीन अधीक्षक सुजा जेम्स, ,व मातंग विकास संस्थेचे अध्यक्ष राजेश रासगे भारतीय जनता पार्टी खडकी मंडल अध्यक्ष शाम कांची , अजित पवार, राहुल कांबळे , शिवसेनेचे हेमंत यादव, प्रशांत राणे ,माऊली बोजवारे, मारुती शेलार,राजु सदामते, मनोज तिगोटे, आकाश परमवार,मधुकर कांबळे,भोलेश वैराट, गणेश पोलकम, किरण बिरांजे, बबन गवळी, विशाल शेलार, उपस्थिती होते.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏



















