Homeमहाराष्ट्रमुंबईत परिवहन आयुक्तांविरोधात बॅनरबाजी; रिक्षावाल्यांचा ३० सप्टेंबरला मोठ्या आंदोलनाचा इशारा

मुंबईत परिवहन आयुक्तांविरोधात बॅनरबाजी; रिक्षावाल्यांचा ३० सप्टेंबरला मोठ्या आंदोलनाचा इशारा

पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live

डॉ. केशव क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रिक्षा संघटनेचे आंदोलन तीव्र, ओला-उबर दरकपातीसह बाईक-टॅक्सीवर नियंत्रणाची मागणी

मुंबई : पुणे पीसीएमसी न्यूज नेटवर्क : ॲप-आधारित ओला-उबर कंपन्यांच्या मनमानी धोरणांविरोधात आणि बाईक-टॅक्सी सेवांच्या वाढत्या प्रभावामुळे रिक्षा-टॅक्सी चालक संतप्त झाले आहेत. रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवार ता. १८ सरप्टेंबर परिवहन आयुक्त कार्यालयासमोर बॅनरबाजी करून निदर्शने करण्यात आली.
या वेळी चालकांनी सरकार व परिवहन विभागाविरोधात घोषणाबाजी करत तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली. “दररोज वाढणारे इंधन, देखभाल खर्च आणि ॲप-कंपन्यांचे हुकूमशाही नियम  यामुळे चालकांचा व्यवसाय धोक्यात आला आहे. आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाले तर ३० सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या आंदोलनाला सुरुवात करू,” असा इशारा डॉ. क्षीरसागर यांनी दिला.

यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या कॅब, रिक्षा व टॅक्सी चालकांनी ‘टेस्ला मंत्री हाय हाय ‘अशा घोषणा देऊन परिवहनमंत्र्यांचा निषेध केला

तसेच राज्यातील लाखो रिक्षा आणि चालक शासनाचा निषेध करण्यासाठी व 30 सप्टेंबर च्या आंदोलनाचे जनजागृती करण्यासाठी त्यांच्या वाहनांवर खालील प्रकारे स्टिकर्स लावतील.

प्रमुख मागण्या
प्रत्येक प्रवासासाठी किमान भाडे निश्चित करणे
आरटीओने ठरवलेले दर ॲप-कंपन्यांनी सक्तीने लागू करणे
चालकांसाठी ‘कल्याणकारी मंडळ’ स्थापन करणे
रॅपिडो व इतर बाईक-टॅक्सी सेवांवर त्वरित नियंत्रण आणणे

या आंदोलनाचा परिणाम मुंबई, पुणे, नागपूरसह इतर शहरांमध्ये होण्याची शक्यता आहे. ३० सप्टेंबर रोजी कामबंद/चक्का जामसारखे तीव्र आंदोलन झाल्यास सामान्य प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे. प्रशासनाने तोपर्यंत ठोस भूमिका घेतली नाही तर संघर्ष तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!