खडकी / प्रतिनिधी : दि. २४ डिसेंबर २०२५ नववर्षाच्या मंगलमय सुरुवातीलाच श्री श्याम भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. श्याम भक्तांच्या अर्जीनुसार व श्याम बाबांच्या कृपेने नववर्षातील पहिली संध्या पूर्णतः श्याम नामस्मरणात रंगणार आहे. गुरुवार, १ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजल्यापासून उशिरापर्यंत खडकी येथील लाल बहादूर शास्त्री हायस्कूल येथे भव्य श्री खाटू श्याम बाबा संकीर्तन आयोजित करण्यात आले आहे.
या संकीर्तनात श्याम बाबांच्या अलौकिक दरबाराचे व श्याम ज्योतीच्या दर्शनाचा भक्तांना लाभ मिळणार आहे. संपूर्ण कुटुंबासह उपस्थित राहून श्याम कृपेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
कार्यक्रमस्थळी महाप्रसादाचे आयोजन रात्री ८ वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत करण्यात आले असून, भाविकांसाठी उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे.
या भक्तिमय संकीर्तनात सुप्रसिद्ध भजन प्रवाहक
श्री संजय अगरवाल (छत्तीसगड) आणि
श्री जितेश शर्मा (पुणे)
हे श्याम नामाची भक्तिसंगीत सादर करणार आहेत.
या कार्यक्रमाचे आयोजन अग्रवाल समाज परिवर्तन खडकी, श्री श्याम परिवार, खडकी व पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏

















