हरीश शर्मा / मुख्य संपादक : निवडणूक 2026 पुणे महापालिका निवडणुकीची चाहूल लागताच शहरातील राजकीय हालचालींना वेग आला असला, तरी प्रभाग क्रमांक ७ आणि ८ मधील नागरिकांचे मूलभूत प्रश्न आजही प्रलंबितच असल्याचे वास्तव समोर येत आहे. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन आणि वाहतूक कोंडी यांसारख्या समस्यांमुळे नागरिक त्रस्त असून, निवडणुकीच्या वेळीच आश्वासनांचा पाऊस पडतो इतर वेळी जातात कुठे ? अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
पाच वर्षे झोप, निवडणुकीत जागे; प्रभाग ७ व ८ मधील नागरिकांचा आरोप
प्रभाग ७ आणि ८ शिवाजीनगर , औंध बोपोडी मध्ये अनेक ठिकाणी खड्डेमय रस्ते, वारंवार होणारा पाणीपुरवठ्याचा गोंधळ, उघडी ड्रेनेज लाइन आणि कचऱ्याचे साम्राज्य ही रोजचीच समस्या बनली आहे. या प्रश्नांबाबत वारंवार तक्रारी करूनही ठोस उपाययोजना न झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
राजकीय पक्षांकडून मात्र निवडणूक डोळ्यासमोर ठेवून बैठका, शक्तिप्रदर्शन आणि इच्छुक उमेदवारांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. तिकीट कोणाला मिळणार, कोणाचा प्रभाग सुटणार, यावर चर्चा रंगत असताना, नागरिकांचे प्रश्न मात्र दुर्लक्षित राहिल्याचा आरोप होत आहे.
याच पार्श्वभूमीवर प्रभाग ७ व ८ मध्ये अपक्ष उमेदवारांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, “पक्षांपेक्षा काम करणारा प्रतिनिधी हवा” अशी स्पष्ट भूमिका अनेक नागरिक मांडताना दिसत आहेत. काही ठिकाणी प्रस्थापित पक्षांवर नाराज असलेले स्थानिक कार्यकर्तेही अपक्ष लढण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठमोठी आश्वासने दिली जात असली, तरी गेल्या कार्यकाळात नेमकं काय केलं, हा प्रश्न नागरिक विचारत आहेत. यावेळी मतदार जागरूक झाला असून, प्रभाग ७ आणि ८ मधील निकाल सत्ताधारी व विरोधकांसाठी चांगलाच धक्का देणारा ठरू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏

















