पुणे / प्रतिनिधी : दि. २६ डिसेंबर २०२५ महान गायक पद्मश्री मोहम्मद रफी यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त महान गायक मो. रफी फाउंडेशनच्या वतीने कॅम्प येथील कोहिनूर चौक येथे भव्य वाढदिवस समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी केक कापून रफी साहेबांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी तसेच पुण्यातील नामवंत कलाकारांनी आवर्जून हजेरी लावली. पुणे शहरातून कलाकार व रसिकांनी उपस्थिती दर्शवत कार्यक्रमास भरभरून प्रतिसाद दिला.
याच अनुषंगाने रफी साहेबांच्या नावाने कोरेगाव पार्क येथील मौलाना अबुल कलाम आझाद सांस्कृतिक भवन येथे कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलाकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष सलीम शेख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या पहिल्याच कार्यक्रमाला नागरिक व कलाकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पुढील काळातही असेच उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.
संस्थेचे पदाधिकारी :
संस्थापक अध्यक्ष : मुश्ताकभाई शेख
अध्यक्ष व खजिनदार : सलीम शेख
उपाध्यक्ष : आनंद जगताप, जयंत मस्के
सचिव : राजेंद्र रेड्डी
उपसचिव : विनोद रणपिसे
सल्लागार : प्रवीण शेळके
संघटक : मनीष सौदे
मार्गदर्शक : लक्ष्मीकांत अफजलपूरकर
महिला अध्यक्ष : संगीता लाड
महिला उपाध्यक्ष : उर्मिला कवडे
कार्याध्यक्ष : गौरी बारसे
उप कार्याध्यक्ष : विद्या गडकरी
सचिव : पृथा शहा
— पुणे पीसीएमसी न्यूज 24 : Live

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏

















