खडकीत दोन दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत; आज दुपारी 4 वाजेपर्यंत कमी दाबाने पाणी येणार
खडकी | प्रतिनिधी
खडकी व परिसरात गेले दोन दिवस नियमित पाणीपुरवठा झाला नसल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. घरगुती वापरासाठी पाणी साठवणूक करावी लागल्याने खडकीकरांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, वारजे परिसरात मुख्य जलवाहिनी (मोठी पाइपलाइन) दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे हा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. वारजे येथून होळकर पाणीपुरवठा केंद्रात पाणी येते आणि तेथूनच खडकी व आजूबाजूच्या परिसराला पाणीपुरवठा केला जातो.
या दुरुस्ती कामाचा थेट परिणाम खडकीतील नागरिकांवर झाला असून, दोन दिवसांपासून अनेक भागांत पाणीपुरवठा पूर्णतः बंद होता.
दरम्यान, आज शुक्रवार दि. 27 रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत खडकी परिसरातील पाणीपुरवठा हळूहळू सुरळीत होणार असून, सुरुवातीला कमी दाबाने पाणी सोडण्यात येईल, अशी माहिती पुणे पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.
नागरिकांनी आवश्यक तेवढाच पाण्याचा वापर करावा व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏






















