सांगली : दि. 5 नोव्हेंबर महाराष्ट्र शासनाने अखेर सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर या शहराचं नाव ‘ईश्वरपूर’ असं करण्याचा निर्णय अधिकृतपणे जाहीर केला आहे. राज्य सरकारने याबाबतची राजपत्र अधिसूचना जारी केली असून, इस्लामपूर नगरपरिषद याचं नवं नाव ‘ऊरूण ईश्वरपूर नगरपरिषद’ असं ठेवण्यात आलं आहे.
ही अधिसूचना राज्य शासनाच्या नगरविकास विभागामार्फत काढण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाने (MHA) या नाव बदलास मंजुरी दिल्यानंतर राज्य शासनाने अधिकृतपणे हा निर्णय जाहीर केला.
राज्य शासनाच्या राजपत्रात नमूद करण्यात आलं आहे की, ‘ भारत सरकारच्या गृहमंत्रालयाच्या मान्यतेनंतर महाराष्ट्र शासन इस्लामपूर तालुक्याचं नाव बदलून ‘ईश्वरपूर’ असं घोषित करत आहे. तसेच, इस्लामपूर नगरपरिषद आता ‘ऊरूण ईश्वरपूर नगरपरिषद’ या नावाने ओळखली जाईल.’
या निर्णयानंतर सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचं नवं ओळखपत्र ‘ईश्वरपूर’ या नावाने तयार होणार आहे. नागरिकांमध्ये या बदलाबद्दल विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
याबाबत अधिसूचना ४ नोव्हेंबर २०२५ ला जाहीर करण्यात आली आहे.
स्त्रोत: महाराष्ट्र शासन राजपत्र
पुणे पीसीएमसी न्यूज 24 : Live

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏






















