खडकी / प्रतिनिधी : दि. २७ नोव्हेंबर २०२५। रामटेकडी येथील राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ) गट क्रमांक 2 मधील वरिष्ठ हवालदार सुनील उर्फ बापू बसवराज नाईक वय ४२ यांचे आजारपणामुळे निधन झाले असून, त्यांच्या जाण्याने पोलीस दलासह खडकी बाजार परिसरात शोककळा पसरली आहे.
२००६ पासून त्यांनी पोलिस सेवेत उल्लेखनीय कार्य केले. कर्तव्यनिष्ठ, शांत स्वभावाचे आणि सहकाऱ्यांमध्ये लोकप्रिय असे ते एक विश्वासू अधिकारी म्हणून ओळखले जात होते.
ते खडकी येथील शिवशक्ती मित्र मंडळाचे पदाधिकारी होते व सामाजिक कार्यातही ते सतत सक्रिय राहिले. सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा उत्साही सहभाग कायम लक्षात राहील.
त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगी, आई, फर्ग्युसन महाविद्यालयातील कर्मचारी भाऊ राहुल, पोलिस कर्मचारी बहिण ज्योती तसेच काका-काकू असा मोठा परिवार आहे. ते खडकी शिक्षण संस्थेचे संचालक महादेव नाईक यांचे पुतणे होते.
त्यांच्या निधनाने पोलीस दलाने एक निष्ठावान, शांत स्वभावाचा आणि सेवाभावी अधिकारी गमावला आहे.
पुणे पीसीएमसी न्यूज 24:Liveतर्फे त्यांच्या आत्म्यास श्रद्धांजली व परिवारास सांत्वन.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏

















