हिंजवडी / प्रतिनिधी : दि. २६ नोव्हेंबर २०२५ हिंजवडी, वाकड, रावेत, तळवडे पुनावळे , जांबे, नेरे दत्तवाडी, कासारसाई आदी परिसरात बांधकाम व औद्योगिक वाहतूक वाढल्याने आरएमसी ट्रक, डंपर, मिक्सर यांसारख्या अवजड वाहनांची ये-जा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या वाहनांमुळे शहरात सकाळी व सायंकाळी वाहतूक कोंडी, रस्त्यांची हानी आणि अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने पोलिसांनी यावर कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
अवजड वाहनांवर नियंत्रणासाठी विशेष उपाययोजना राबवण्याचा निर्णय २४ नोव्हेंबर च्या उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला. पोलीस आयुक्तांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या चर्चेनंतर प्रमुख मार्गांवर कॅमेरे बसवणे, वाहनांचा वेग नियंत्रित ठेवणे आणि नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची योजना मंजूर केली आहे.
नवीन नियमांनुसार आरएमसी ट्रक, डंपर, मिक्सर या सर्व वाहनांसाठी वेगमर्यादा ३० किमी प्रतितास इतकी आणि वाहनांना कॅमेरे बसवण्याचे निश्चित करण्यात आले आहे. जीपीएस मॉनिटरिंग तसेच स्पीड कॅमेऱ्यांच्या साहाय्याने या वाहनांवर दिवसरात्र नजर ठेवली जाणार आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास त्वरित दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
अवजड वाहनांचे साइड कॅच बंपर, सुरक्षा पट्टे, कार्यरत लाईट्स आणि वाहनांची नियमित तपासणी हे सर्व नियम काटेकोरपणे पाळणे आता बंधनकारक असेल. डंपर आणि मिक्सरमुळे होणारे अपघात कमी करण्याच्या दृष्टीने हे निर्णय महत्त्वाचे ठरणार आहेत.
दरम्यान, आरएमसी प्लांटांना नोटीस देऊन वाहनचालकांचे प्रशिक्षण, प्रमाणित उपकरणे आणि सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वाहनांच्या अनियमित हालचालींवर सतत नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी वाहतूक विभाग, महापालिका आणि संबंधित संस्थांना समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले आहेत.
शहरातील वाढती अवजड वाहतूक आणि त्यामुळे निर्माण होणारा अपघाताचा धोका कमी करण्यासाठी ही कडक अंमलबजावणी अत्यावश्यक असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. नवीन उपाययोजनांमुळे वाहतूक सुरळीत राहण्यास आणि नागरिकांच्या सुरक्षिततेत मोठी भर पडेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏

















