
पुणे पीसीएमसी न्यूज 24: खडकी / प्रतिनिधी
“वंदे मातरम संघटनेच्या पाठपुराव्याला यश “
खडकी बाजार येथील संरक्षण विभागाच्या सी क्यु ए आस्थापनेच्या सीमाभिंतीला लागून गेल्या अनेक वर्षांपासून येथील पथविक्रेते व काही दुकानदारांनी आपले सामान सर्रासपणे पदपथावर ठेवले होते तर काही महाभागांनी भिंतीला लागूनच आपला व्यवसाय सुरू केला होता समोरच भाजी मंडई व मासे विक्री दुकाने असल्याने त्याचा सर्व कचरा याठिकाणी टाकण्यात येत होता त्यात भर म्हणजे मोकाट जनावरे याठिकाणी शेण टाकून घाण करत होते तुंबलेले ड्रेनेज त्यातून वाहणारे मैलायुक्त पाणी यामुळे येथील आरोग्य ही धोक्यात आले होते.मात्र याकडे खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचा आरोग्य विभाग दुर्लक्ष करीत होता .
याकडे लक्ष वेधण्याकरिता ‘वंदे मातरम संघटना खडकी विभागाने खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे या सर्व गोष्टींचा लेखी पाठपुरावा केला , त्यानंतर ‘डोळ्यावर पट्टी बांधून गांधारीची भूमिका घेणारे बोर्डाचे आरोग्य अधीक्षक ताडकन जागे झाले ‘ व येथील पदपथावर केलेले अतिक्रमणांवर कारवाई करून याठिकाणी स्वछता करून वाहणारे ड्रेनेज दुरुस्त करून तसेच सीमाभिंतीजवळ असलेल्या पदपथावर लोखंडी रेलिंग लावून संरक्षण विभागाची भिंत सुरक्षित केली.
“वंदे मातरम संघटनेने केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळेच हे शक्य झाले त्यामुळे परिसरातील नागरिकांनी वंदे मातरम संघटनेचे आभार मानले .

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏



















