Homeखडकीखडकीकरांनी दिला बाप्पांना भावपूर्ण निरोप अठरा तास पारंपरिक वाद्य डीजे वाघ्या मुरळी...

खडकीकरांनी दिला बाप्पांना भावपूर्ण निरोप अठरा तास पारंपरिक वाद्य डीजे वाघ्या मुरळी नृत्य

पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live

खडकी / प्रतिनिधी :  दहा दिवसांच्या गणेशोत्सवाच्या शेवटी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या परिसरातील गणपती बाप्पांना खडकीकरांनी भावपूर्ण निरोप दिला. परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची गणेश विसर्जन मिरवणूक शिवाजी पुतळा स्मारक येथून सकाळी दहा वाजल्यापासून सुरवात करण्यात आली तर खडकी येथील महादेव मंदिर घाटावर रात्री 2 च्या दरम्यान शेवटच्या सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणपतीचे विसर्जन झाले. अठरा तास खडकी कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत विसर्जन मिरवणूक पार पडली.

Oplus_131072

सकाळी  दहा च्या दरम्यान  खडकी चा राजा व्यापारी मित्र मंडळ, नवा बाजार मित्र मंडळ , मित्र सागर मंडळ, यांची पारंपरिक पद्धतीने ढोल ताशा वाद्य पथक तसेच दर्जी गल्ली येथील विठ्ठल मंदिर मंडळाची फुलांनी सजवलेल्या पालखीतून मिरवणूक काढण्यात आली होती, महिलांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला महिलांनी फुगड्या खेळल्या ज्येष्ठ व्यक्तींनी भजन टाळ मृदंग सह मिरवणुकीत सहभागी झाले होते. मधल्या काळात घरगुती गणपती चे विसर्जन करण्यात आले. दुपारनंतर खडकीतील मानाचा पहिला गणपती नवी तालीम नूतन तरुण मंडळ  निर्भीड ढोल लेझीम संघ शिवाजी पुतळा स्मारक येथून मिरवणुकीत सामील झाला त्यानंतर मानाचा दुसरा मधला बाजार तरुण मंडळ यांचे आगमन झाले गाडीअड्डा येथील श्री दत्त तरुण मंडळ आकर्षक भव्य फुलांच्या रथमध्ये , गवळीवाडा तरुण मंडळाने यंदा ‘झाडे लावा झाडे जगवा ‘ हा संदेश देत संपूर्ण गणेश रथ हिरवाईने सजवला होता. संजय गांधी भाजी मार्केट मंडळाने वाघ्या मुरळी नृत्य पाहण्यासाठी अलोट गर्दी खेचली होती सर्वांचे लक्ष वेधले जात होते खडकीतील प्रमुख आकर्षण म्हणून संजय गांधी भाजी मार्केट मंडळाकडे तुफान गर्दी होत होती. यासह दर्जी गल्ली येथील नवनाथ दर्शन हा देखावा बाल मित्र मंडळाने रथावर केला होता. मानाजी बाग येथील आदिनाथ तरुण मंडळाने आकर्षक विद्युत रोषणाई रथ मध्ये गणपती विराजमान केले होते. नॅशनल यंग क्लब हनुमान मोहोल्ला , खडकी यंग क्लब, अमर शिवराज मित्र मंडळ, इंदिरा क्रीडा मंडळ, भारतमाता मित्र मंडळ, धोबी गल्ली मित्र मंडळ

डी जे चा धुमाकूळ आणि पोलीस हतबल

यंदा खडकीतही असंख्य मंडळांनी डीजे  लेझर लाईट चा दणदणाट करत ट्रॅक्टर वर हुल्लडबाजी करत गणेश विसर्जन मिरवणुकीत त आपल्या मंडळांची छाप पाडली. यावेळी अश्या मंडळांची पोलिसांनी दखल घेत त्यांच्या नावाची नोंद करताना पोलीस दिसत होते. संजोग मित्र मंडळ,  यशवंत मित्र मंडळ, शिवप्रताप तरुण मंडळ, विकास तरुण मंडळ , आझाद मित्र मंडळ, आकाश मित्र मंडळ, डेपो लाईन मित्र मंडळ, श्री दत्त तरुण मंडळ, मिलिटरी डेअरी फार्म मंडळ, इंदिरा तरुण मंडळ भोईटे चाळ, आदींनी डी जे च्या तालावर आनंद घेतला.

‘समस्त खडकीकर गणेश भक्त भंडारा’ यंदा नसल्यामुळे गणेशभक्तांमध्ये नाराजी चा सूर

सात आठ वर्षांपूर्वी खडकीतील आठ ते दहा व्यक्ती एकत्र येऊन खडकीतील कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल चौक येथे महाभंडारा चे आयोजन केले होते व ‘समस्त खडकीकर गणेशभक्त महाभंडारा’ या ब्रीदवाक्याखाली खडकीतून असंख्य गणेशभक्तांनी त्यास मदतीचा हात दिला त्यानंतर दुसऱ्या वर्षी याठिकाणी जागा अपुरी पडत असल्याने हा विसर्जन घाटावर भांडाऱ्याचे आयोजन करण्यात आले. दुसऱ्या वर्षांपासून याची धुरा खडकीतील व्यापाऱ्यांनी सांभाळायला सुरवात केली त्यानंतर पाच ते सहा वर्षे निरंतर भांडारा सुरू राहीला पाच सहा वर्षे खडकीतील व्यापारी सर्वांकडून ऐच्छिक वर्गणी घेऊन भांडारा करत होते त्याचा लाभ अनंत चतुर्थी च्या दिवशी हजारो गणेशभक्त मंडळांचे कार्यकर्ते घेत होते गणेश विसर्जन च्या दिवशी दिवसभर धावपळ असल्याने विसर्जन घाटावरच महाप्रसाद मिळाल्याने हजारो गणेशभक्त तृप्त होत होते मात्र यंदा अचानक गणेश भांडारा विसर्जन घाटावर नसल्याने अनेक गणेशभक्ताची निराशा झाली तर अनेकांना उपाशी पोटी राहावे लागले. कारण गेली सहा सात वर्षे भांडारा सुरू होता अचानक यावर्षी काय झाले तशी सूचना ही न दिल्याने गणेशभक्तांमध्ये नाराजी चा सूर दिसून आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!