Homeपुणे“स्वच्छता नाही तर झाडू हाती!” उपमहापौर परशुराम वाडेकर यांचा घनकचरा विभागाला इशारा;...

“स्वच्छता नाही तर झाडू हाती!” उपमहापौर परशुराम वाडेकर यांचा घनकचरा विभागाला इशारा; पहाटे 6 वाजता अचानक तपासणी

बोपोडी  | प्रतिनिधी : दि. १५ फेब्रुवारी २०२६
शहरातील घनकचरा विभागाच्या ढिसाळ आणि आंधळ्या कारभारावर उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी थेट आक्रमक भूमिका घेतली आहे. स्वच्छतागृह आणि कचरा व्यवस्थापनाची नियमित स्वच्छता झाली नाही तर “मी स्वतः झाडू हाती घेईन” असा थेट इशारा त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला.

Oplus_131072

पदभार स्वीकारल्यानंतर  वाडेकर यांनी पहाटे ६ वाजता अचानक धडक तपासणी केली. या वेळी घनकचरा विभाग प्रमुख अविनाश सपकाळ, क्षेत्रीय आयुक्त नायकर, मुख्य आरोग्य निरीक्षक इनामदार, आरोग्य निरीक्षक विनायक चोपडे, प्रवीण दरेकर, मुकादम संतोष शेलार आणि सिद्धार्थ बागुल यांच्यासह दोन ते तीन आरोग्य कोठ्यांची पाहणी करण्यात आली.
धक्कादायक वास्तव उघड
तपासणीदरम्यान खुद्द आरोग्य निरीक्षक अनुपस्थित असल्याचे आढळले. ५४ सफाई कर्मचाऱ्यांपैकी फक्त २३ कर्मचारी हजर होते. मात्र कागदोपत्री १०० टक्के उपस्थिती दाखवण्यात आल्याचा प्रकार समोर आला.
या प्रकारामुळे विभागात अधिकाऱ्यांमध्ये संगनमत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. एकमेकांच्या चुकांवर पांघरूण घालण्याचा प्रकार सुरू असल्याचे स्पष्ट दिसून आले.
दंडात्मक कारवाईला सुरुवात
उशिरा आलेल्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ दंडात्मक कारवाई करण्यात आली असून उर्वरित अनुपस्थित कर्मचाऱ्यांवरही कठोर कारवाई होणार असल्याचे वाडेकर यांनी स्पष्ट केले.
नागरिकांचे आरोग्य धोक्यात”
शहरातील विशेषतः झोपडपट्टी भागातील नागरिकांना अस्वच्छतेमुळे नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. सार्वजनिक शौचालयांची अवस्था अत्यंत बिकट असून कचरा पेट्या वेळेवर रिकाम्या केल्या जात नाहीत. यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला आहे.
घनकचरा विभाग प्रमुख सपकाळ यांच्या उपस्थितीतच वस्तुस्थिती उघड झाल्याने आता कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे. विभागाच्या कारभारात तातडीने सुधारणा करण्याचे कडक आदेश देण्यात आले आहेत.
जनतेच्या आरोग्याशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही असा स्पष्ट इशारा उपमहापौरांनी दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सारसबाग बंद निर्णयावर मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनचा आक्षेप, प्रशासनाने फेरविचार करावा अशी मागणी

“सुरक्षेच्या कारणांचा आधार घेत विशिष्ट समाजाला लक्ष्य केल्याचा संशय” — डॉ. फरहा शेख यांचे निवेदन बोपोडी | प्रतिनिधी : दी. 27 मे 2026 बकरी ईदनंतर पारंपरिक...

खडकी छावणीतील हातगाडी परवाना धारकांना मुदतवाढ द्या, सारथी सोशल फाउंडेशनची मागणी

कागदपत्रे अपूर्ण राहिल्याने अनेक हातगाडी व्यावसायिक अडचणीत; खडकी छावणी परिषदेला निवेदन सादर खडकी | प्रतिनिधी : दी. 26 मे 2026           ...

पीसीएमसीचा अतिक्रमणधारकांना इशारा; १५ दिवसांत पदपथ मोकळे करा, अन्यथा कठोर कारवाई

नागरिकांच्या सुरक्षित व विनाअडथळा प्रवासासाठी महापालिकेची मोहीम तीव्र; क्षेत्रीय कार्यालयनिहाय कारवाईचा आढावा पिंपरी | प्रतिनिधी : दि. 26 मे 2026           ...

पुण्यात मुस्लिम समाजाची गाईला ‘राष्ट्रीय प्राणी’ घोषित करण्याची मागणी

सामाजिक सलोखा, शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पुणे | प्रतिनिधी : दि. 26 मे 2026               ...

पुणे शहर काँग्रेसच्या नवनिर्वाचित शहराध्यक्षांचा जनहित जागृती मंचतर्फे सत्कार

डॉ. विश्वजीत कदम यांना शॉल व संविधान पुस्तक भेट देत मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव बोपोडी | प्रतिनिधी : दि. 23 मे 2026         ...

error: Content is protected !!