लष्कर परिसरातील राणी लक्ष्मीबाई उद्यानात सिद्धार्थ ग्रंथालयाचा उपक्रम उत्साहात पार पडला
कॅम्प / प्रतिनिधी : दि. 3 नोव्हेंबर
लष्कर भागातील राणी लक्ष्मीबाई उद्यान येथे सिद्धार्थ ग्रंथालयाच्या वतीने “दिवाळी पाडवा पहाट” हा संगीतमय कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.
या प्रसंगी ग्रंथालयाचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितले की, अशा सांस्कृतिक उपक्रमांमुळे समाजात ऐक्य, आनंद आणि परस्पर स्नेह वृद्धिंगत होतो.
कार्यक्रमास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक अशोक कदम, ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष बापूसाहेब गाणला, रक्ताचे नाते ट्रस्टचे अध्यक्ष राम बांगड, पॉवरलिफ्टर श्याम साहनी, दिलीप भिकुले, विकास भांबुरे, विजय भोसले, सचिन कांबळे, मोहसीन शेख, डॉ. बंटी धर्मा आणि संजय गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
संगीतमय सादरीकरण, पारंपरिक पोशाख, आणि उत्साही वातावरणामुळे उपस्थितांमध्ये पाडव्याचा आनंद द्विगुणित झाला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रभावीपणे करण्यात आले तर अखेरीस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ग्रंथालयाच्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏






















