Homeपिंपरी चिंचवडमोबाईल च्या व्यसनाचे फायदे व तोटे विषयावर पोस्टर प्रदर्शन स्पर्धा संपन्न

मोबाईल च्या व्यसनाचे फायदे व तोटे विषयावर पोस्टर प्रदर्शन स्पर्धा संपन्न

पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live

पिंपरी : जग आधुनिकतेकडे झपाट्याने प्रगती करत आहे आपला भारत देश ही ‘डिजिटल इंडिया’ पूर्णत्वावर आहे मात्र हे सर्व होत असताना आपल्या जीवनात ‘मोबाईल’ हा अविभाज्य घटक बनला आहे. मोबाईल शिवाय आपण कोणतेही काम करू शकत नाही पूर्वी माणसाच्या जीवनासाठी ‘ अन्न, वस्त्र ,निवारा ‘ या मूलभूत गरजा समजल्या जात होत्या आता मात्र त्यात मोबाईल ही एक गरज आहे असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही. मात्र या मोबाईल चे जेवढे फायदे आहेत तेवढेच तोटे ही , याच विषयावर  मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग, विद्यार्थी सहाय्यक समिती पुणे, पिंपरी चिंचवड सायन्स पार्क आणि इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्ज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या  ‘ नवे आव्हान बालकांपासून थोरांपर्यंत ‘ या  आंतरशालेय व आंतरमहाविद्यालयीन पोस्टर प्रदर्शन स्पर्धा घेण्यात आली होती त्याची अंतिम फेरी नुकतीच उत्साहात पार पडली.

या स्पर्धेत अनेक शाळा व महाविद्यालयांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी  “मोबाईलच्या व्यसनाचे फायदे आणि तोटे”  या विषयावर कल्पकतेने विचार मांडत समाजामध्ये जनजागृती घडवून आणण्याचा प्रभावी प्रयत्न केला. रंग, रेषा व शब्दांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पोस्टर्सनी प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडले.

स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना  इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्ज तर्फे आकर्षक स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आल्या. या उपक्रमास शिक्षक, पालक व समाजातील विविध घटकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

संपूर्ण कार्यक्रमाने विद्यार्थ्यांची सर्जनशीलता, सामाजिक जाणिवा आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन यांना वाव मिळवून दिला.
या कार्यक्रमासाठी पिंपरी चिंचवड सायन्स पार्क चे संचालक  तुपे, मविप चे पदाधिकारी, पुणे विंग्ज क्लब च्या प्रेसिडेंट उज्ज्वला नवले, सेक्रेटरी सुविधा नाईक आणि इतर सदस्य उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!