Homeपुणे"मराठी सक्ती फक्त रिक्षाचालकांवरच का? – कामगार सभेचा सरकारला थेट सवाल!"

“मराठी सक्ती फक्त रिक्षाचालकांवरच का? – कामगार सभेचा सरकारला थेट सवाल!”

पुणे  | हरीश शर्मा : दि. १५ एप्रिल २०२६
१ मे पासून रिक्षाचालकांसाठी मराठी भाषेची सक्ती करण्याच्या परिवहन मंत्रालयाच्या निर्णयाचे एका बाजूला स्वागत होत असताना, दुसऱ्या बाजूला या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. महाराष्ट्र कामगार सभाचे अध्यक्ष डॉ. केशव नाना क्षीरसागर यांनी या धोरणावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
“मराठी सक्तीचा निर्णय योग्यच आहे, पण तो फक्त रिक्षाचालकांपुरता मर्यादित का?” असा सवाल करत त्यांनी सरकारवर दुहेरी निकष लावल्याचा आरोप केला आहे.

डॉ. क्षीरसागर यांनी स्पष्टपणे म्हटले की,
“सुरुवात आधी मंत्रीमंडळातील मराठी नीट बोलू किंवा लिहू न शकणाऱ्या सदस्यांपासून करावी.”
“सरकारी कंत्राट घेणारे उद्योजक, तसेच सिनेसृष्टीतील नामवंत कलाकार यांनाही मराठी सक्ती लागू करावी.”
त्यांनी पुढे कडक शब्दांत सरकारवर टीका करत म्हटले की,
दरवेळी कष्टकरी वर्गालाच लक्ष्य करून राजकीय पोळी भाजण्याचे प्रकार थांबवले पाहिजेत. न्याय सर्वांसाठी समान असला पाहिजे.”
या वक्तव्यामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे असून, रिक्षाचालक संघटनाही या मुद्द्यावर आक्रमक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, १ मे (महाराष्ट्र दिन) पासून लागू होणाऱ्या या निर्णयामुळे प्रत्यक्षात अंमलबजावणी कशी होणार आणि इतर घटकांवरही ही सक्ती लागू होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आता प्रश्न एकच – मराठी सक्ती सर्वांसाठी की फक्त रिक्षाचालकांसाठी?

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सारसबाग बंद निर्णयावर मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनचा आक्षेप, प्रशासनाने फेरविचार करावा अशी मागणी

“सुरक्षेच्या कारणांचा आधार घेत विशिष्ट समाजाला लक्ष्य केल्याचा संशय” — डॉ. फरहा शेख यांचे निवेदन बोपोडी | प्रतिनिधी : दी. 27 मे 2026 बकरी ईदनंतर पारंपरिक...

खडकी छावणीतील हातगाडी परवाना धारकांना मुदतवाढ द्या, सारथी सोशल फाउंडेशनची मागणी

कागदपत्रे अपूर्ण राहिल्याने अनेक हातगाडी व्यावसायिक अडचणीत; खडकी छावणी परिषदेला निवेदन सादर खडकी | प्रतिनिधी : दी. 26 मे 2026           ...

पीसीएमसीचा अतिक्रमणधारकांना इशारा; १५ दिवसांत पदपथ मोकळे करा, अन्यथा कठोर कारवाई

नागरिकांच्या सुरक्षित व विनाअडथळा प्रवासासाठी महापालिकेची मोहीम तीव्र; क्षेत्रीय कार्यालयनिहाय कारवाईचा आढावा पिंपरी | प्रतिनिधी : दि. 26 मे 2026           ...

पुण्यात मुस्लिम समाजाची गाईला ‘राष्ट्रीय प्राणी’ घोषित करण्याची मागणी

सामाजिक सलोखा, शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पुणे | प्रतिनिधी : दि. 26 मे 2026               ...

पुणे शहर काँग्रेसच्या नवनिर्वाचित शहराध्यक्षांचा जनहित जागृती मंचतर्फे सत्कार

डॉ. विश्वजीत कदम यांना शॉल व संविधान पुस्तक भेट देत मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव बोपोडी | प्रतिनिधी : दि. 23 मे 2026         ...

error: Content is protected !!