पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live
खडकी : येथील खडकी शिक्षण संस्थेचे, टिकाराम जगन्नाथ कला, वाणिज्य व विज्ञान (स्वायत्त) महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांना श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवाशी जैन कॉन्फ्रेन्स मुंबई,पुणे पंचम झोन व राष्ट्रीय महिला शाखा यांच्या वतीने ‘आदर्श प्राचार्य पुरस्कार’ ग.दि. माडगूळकर सभागृह,आकुर्डी येथे झालेल्या समारंभात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या शुभहस्ते ज्योती सोळंकी, कल्याण गंगवाल, प्रा. सुरेखा कटारिया व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

प्राचार्य डॉ. चाकणे यांनी शैक्षणिक क्षेत्रात प्रगल्भ दृष्टीकोन व दूरदृष्टी दाखवून महाविद्यालयाचा शैक्षणिक दर्जा उंचावला आहे. महाविद्यालयास नॅक अ श्रेणी, स्वायत्ततेचा दर्जा मिळवून दिला आहे, संशोधन व नवनविन उपक्रमांस चालना देणे, पेटंट प्राप्ती, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांचे आयोजन, समाजाभिमुख उपक्रम राबविणे,विध्यार्थी केंदबिंदू मानत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे, या सर्व क्षेत्रांत त्यांचे योगदान उल्लेखनीय ठरले आहे. प्रशासकीय कामकाजातील पारदर्शकता, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना प्रेरणा देणारे नेतृत्व, समाजोपयोगी कार्यावर भर, नविन्याच्या ध्यास असणारे शैक्षणिक धोरण या सर्व गुणांमुळे त्यांची आदर्श प्राचार्य म्हणून ओळख आदर्शवत झाली आहे. हा सन्मान त्याचेच द्योत्तक आहे.
पुरस्कार प्रदान करते प्रसंगी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी म्हणाले त्यांनी की , “प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांचे शैक्षणिक नेतृत्व व विद्यार्थीहितासाठीचे प्रयत्न हे प्रेरणादायी आहेत. त्यांचा हा सन्मान म्हणजे शिक्षण क्षेत्राचाच गौरव आहे.”
या पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, उपाध्यक्ष अनिल मेहता, सचिव आनंद छाजेड तसेच सर्व पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी डॉ. चाकणे यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
या पुरस्काराने केवळ एका प्राचार्याचा गौरव झालेला नाही, तर खडकी शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक कार्याचा सन्मान झाला आहे. मिळालेला हा सन्मान संपूर्ण महाविद्यालयीन परिवारासाठी प्रेरणादायी ठरला आहे.अशा भावना प्राचार्य डॉ. चाकणे यांनी व्यक्त केल्या.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏






















