Homeपिंपरी चिंचवडपथविक्रेता कायद्याची अंमलबजावणी टाळून निर्णय घेणे अयोग्य; आयुक्तांनी कायदेशीर प्रक्रियेचे पालन करावे...

पथविक्रेता कायद्याची अंमलबजावणी टाळून निर्णय घेणे अयोग्य; आयुक्तांनी कायदेशीर प्रक्रियेचे पालन करावे – काशिनाथ नखाते

पथविक्रेता समितीला डावलून हॉकर्स झोनबाबत निर्णय घेऊ नयेत; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

पिंपरी, दि. ९ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने पथविक्रेत्यांशी संबंधित कोणतेही निर्णय घेताना पथविक्रेता (उपजीविकेचे संरक्षण व पथविक्रीचे विनियमन) अधिनियम, २०१४ तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे मत कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले आहे.
नखाते यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पथविक्रेत्यांच्या पुनर्वसन, हॉकर्स झोन निश्चिती, स्थलांतर अथवा अतिक्रमण कारवाईसारख्या विषयांवर निर्णय घेताना संबंधित टाउन वेंडिंग कमिटी (TVC) ची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. समितीला विश्वासात न घेता किंवा तिची बैठक न बोलावता घेतले जाणारे निर्णय कायदेशीर वादाच्या भोवऱ्यात सापडू शकतात, असा दावा त्यांनी केला.

त्यांच्या मते, शहरातील हजारो पथविक्रेत्यांच्या उपजीविकेशी संबंधित प्रश्नांवर प्रशासनाने एकतर्फी भूमिका घेण्याऐवजी कायद्यातील तरतुदी, शासन निर्णय आणि न्यायालयीन निर्देशांचा सखोल अभ्यास करूनच पुढील कार्यवाही करावी. पथविक्रेत्यांना केवळ अतिक्रमण म्हणून पाहण्याऐवजी त्यांना कायद्याने मान्यता प्राप्त उपजीविकाधारक म्हणून वागणूक देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
नखाते यांनी प्रशासनावर टीका करताना सांगितले की, शहरातील मूलभूत नागरी सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता तसेच विविध विकासकामांतील त्रुटींवरही प्रशासनाने तितक्याच गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. फेरीवाला आणि हातगाडीधारकांवर कारवाई करण्यापूर्वी त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्याची जबाबदारीही प्रशासनाचीच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
केंद्र सरकारच्या पीएम स्वनिधी योजनेचा लाभ अधिकाधिक पात्र पथविक्रेत्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष मोहिम राबवावी, अशी मागणीही त्यांनी केली.
पथविक्रेता कायद्याच्या तरतुदींकडे दुर्लक्ष करून मनमानी पद्धतीने निर्णय घेण्याचा प्रयत्न झाल्यास त्याविरोधात कायदेशीर लढा उभारला जाईल. तसेच नॅशनल हॉकर फेडरेशन आणि महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा काशिनाथ नखाते यांनी दिला.
महत्त्वाचा मुद्दा
पथविक्रेता कायदा २०१४ नुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांनी पथविक्रेत्यांबाबतचे धोरणात्मक निर्णय घेताना टाउन वेंडिंग कमिटीची भूमिका विचारात घेणे आवश्यक मानले जाते. त्यामुळे प्रशासनाने सर्व संबंधित घटकांशी चर्चा करूनच पुढील निर्णय घ्यावेत, अशी मागणी संघटनांकडून करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पारदर्शकता, सुरक्षा की विकास? हिंजवडी हिल्स फेज-2 मध्ये रंगणार चुरशीची निवडणूक

मागील समिती अडीच वर्षांत बरखास्त झाल्यानंतर नव्या नेतृत्वाची निवड; तीन पॅनल आणि एक अपक्ष उमेदवार रिंगणात हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 10 जून 2026   ...

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी संजय मराठे यांची नियुक्ती

सांगवी-पिंपळे गुरव परिसरातील पत्रकार बांधवांचे आधारस्तंभ; विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव पुणे | प्रतिनिधी : दी. 8 जून 2026 महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी ज्येष्ठ...

बोपोडी दर्गा प्रकरणी विविध संघटनांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; चौकशी व पुनर्बांधणीची मागणी

बोपोडी | प्रतिनिधी : दि. 6 जून 2026             बोपोडी परिसरातील हजरत शम्सुद्दीन कादरी रहमतुल्लाह अलैह दर्गा पुणे महापालिकेने पाडण्यात...

बोपोडी – खडकी-औंध मधील वाहतूक कोंडी व अतिक्रमणांवर आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचा पाहणी दौरा

नागरिकांना दिलासा देण्यासाठी पोलीस व महापालिका अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी; तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश पुणे | प्रतिनिधी : दी. 5 जून 2026           ...

महामंडळाच्या निवडणुकीत खळबळ! ‘दोन्ही पॅनल एकाच नाण्याच्या दोन बाजू’; अपक्ष उमेदवार शरद लोणकर यांचा...

महामंडळ आणि सदस्यांच्या हितासाठी आठ अपक्ष उमेदवार एकत्र; प्रस्थापितांच्या कारभारावर जोरदार टीका पुणे | प्रतिनिधी : दी. 4 जून 2026 अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या आगामी...

error: Content is protected !!