Homeपुणेबोपोडी दर्गा प्रकरणी विविध संघटनांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; चौकशी व पुनर्बांधणीची मागणी

बोपोडी दर्गा प्रकरणी विविध संघटनांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; चौकशी व पुनर्बांधणीची मागणी

बोपोडी | प्रतिनिधी : दि. 6 जून 2026             बोपोडी परिसरातील हजरत शम्सुद्दीन कादरी रहमतुल्लाह अलैह दर्गा पुणे महापालिकेने पाडण्यात आल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे, मुंबई तसेच राज्यातील विविध सामाजिक, धार्मिक आणि नागरिक संघटनांच्या प्रतिनिधींनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले.
प्रतिनिधी मंडळाने या प्रकरणाची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली. तसेच दर्ग्याबाबत पुढील निर्णय घेताना स्थानिक नागरिकांच्या भावना, ऐतिहासिक वारसा आणि सामाजिक सलोखा यांचा विचार करण्यात यावा, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

निवेदनानुसार, संबंधित दर्गा अनेक वर्षांपासून परिसरातील नागरिकांसाठी श्रद्धास्थान म्हणून ओळखला जात होता. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये विविध प्रतिक्रिया उमटल्या असून प्रशासनाने संपूर्ण प्रकरणात पारदर्शकता राखावी, अशी मागणी करण्यात आली.
प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चे दरम्यान दर्गा पाडण्यामागील कारणे, प्रशासकीय प्रक्रिया आणि संबंधित निर्णयांची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी केली. तसेच कायदेशीर चौकटीत राहून या विषयावर योग्य तो तोडगा काढण्याचे आवाहन करण्यात आले.
या प्रतिनिधी मंडळात अन्सारी साहेब व त्यांची टीम, जमात-ए-मुस्लिमीनचे मुनाफ शेख, स्वीकृत माजी नगरसेवक करीम शेख, दर्गाह समितीचे आरिफ पीरजादे व नियाज पीरजादे, मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनचे अध्यक्ष अन्वर शेख, मूल निवासी संघटनेचे अध्यक्ष अंजुम इनामदार, सादिक शेख, सामाजिक कार्यकर्ते अकबर शेख, रफिक तुर्क, गफ्फार तुर्क तसेच बोपोडी व परिसरातील अनेक नागरिक सहभागी झाले होते.
यावेळी उपस्थित प्रतिनिधींनी शांतता, सामाजिक सलोखा आणि संविधानिक मार्गाने न्याय मिळविण्याची भूमिका व्यक्त केली. कोणत्याही परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून लोकशाही मार्गाने आपली भूमिका मांडली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आलेल्या निवेदनाची दखल घेण्यात आली असून संबंधित मागण्यांबाबत प्रशासनाकडून पुढील कार्यवाही अपेक्षित असल्याचे प्रतिनिधींनी सांगितले.

(संपादकीय टीप : सदर वृत्त निवेदनातील माहितीवर आधारित असून संबंधित प्रशासनाची अधिकृत भूमिका प्राप्त झाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!