Homeखडकीखडकी बाजार परिसरात अतिक्रमणाचा वाढता प्रश्‍न; नागरिकांकडून कारवाईची मागणी

खडकी बाजार परिसरात अतिक्रमणाचा वाढता प्रश्‍न; नागरिकांकडून कारवाईची मागणी

खडकी / प्रतिनिधी : दि. 10 नोव्हेंबर
खडकी बाजार परिसरात गेल्या काही महिन्यांपासून अतिक्रमणाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रस्त्यांच्या कडेला तसेच स्क्वेअर मार्केट भागात अनेक दुकानदारांनी आपल्या दुकानासमोर फळी, स्टँड, आणि कपड्यांचे स्टँड लावून रस्ता अडवल्यामुळे  पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागाच शिल्लक राहत नाही, अशी तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अतिक्रमण विभागाकडून केवळ नाममात्र तपासणी करण्यात येते. विभागाची गाडी बाजारातून फिरते, मात्र प्रत्यक्ष कारवाई फक्त छोट्या पथारीधारकांपुरतीच मर्यादित राहते, अशी स्थानिकांची चर्चा आहे.
स्क्वेअर मार्केट परिसरात अनेक कपड्यांच्या दुकानांबाहेर कपडे अडकवण्यासाठी स्टँड आणि फळी लावल्यामुळे नागरिकांना चालणे, वाहनांना वळणे, तसेच आपत्कालीन परिस्थितीत मार्ग मोकळा ठेवणे कठीण झाले आहे.
या संदर्भात नागरिकांनी मागणी केली आहे की
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाने संपूर्ण बाजारपेठेची नियोजनबद्ध पाहणी करून सर्व प्रकारचे अतिक्रमण हटवावे, आणि पादचाऱ्यांसाठी सुरक्षित व मोकळा रस्ता उपलब्ध करून द्यावा.
अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करावी, अन्यथा नागरिकांकडून उचस्तरीय तक्रारी दाखल केल्या जातील, असा इशारा काही स्थानिकांनी दिला आहे.

याबाबत अधिक माहिती घेण्याकरिता खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या निरीक्षक स्वप्नाली देशमुख यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क केला असता त्या म्हणाल्या ‘ अतिक्रमण विभागाची गाडी बाजारातून रोज फिरवण्यात येते , मात्र आता बोर्डाने अतिक्रमण करणाऱ्या दुकानदारांना नोटीस दिली आहे येत्या दोन दिवसात खडकी बाजारातील दुकानासमोर केलेले अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू करण्यात येणार आहे ‘

फोटो :  खडकी बाजारातील स्क्वेअर मार्केट मध्ये दुकानापुढे फळ्या लावून ग्राहकांना बसण्याची व रस्त्यावर व्यापार सुरू असल्यामुळे नागरिकांना येण्याजाण्यासाठी अडचण होत आहे. तसेच पुढे ही प्रत्येक दुकानदारांनी बाहेर रस्त्यावर स्टँड ला कपडे अडकून ठेवल्यामुळे आधीच अरुंद रस्ता आणखीन अरुंद झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सारसबाग बंद निर्णयावर मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनचा आक्षेप, प्रशासनाने फेरविचार करावा अशी मागणी

“सुरक्षेच्या कारणांचा आधार घेत विशिष्ट समाजाला लक्ष्य केल्याचा संशय” — डॉ. फरहा शेख यांचे निवेदन बोपोडी | प्रतिनिधी : दी. 27 मे 2026 बकरी ईदनंतर पारंपरिक...

खडकी छावणीतील हातगाडी परवाना धारकांना मुदतवाढ द्या, सारथी सोशल फाउंडेशनची मागणी

कागदपत्रे अपूर्ण राहिल्याने अनेक हातगाडी व्यावसायिक अडचणीत; खडकी छावणी परिषदेला निवेदन सादर खडकी | प्रतिनिधी : दी. 26 मे 2026           ...

पीसीएमसीचा अतिक्रमणधारकांना इशारा; १५ दिवसांत पदपथ मोकळे करा, अन्यथा कठोर कारवाई

नागरिकांच्या सुरक्षित व विनाअडथळा प्रवासासाठी महापालिकेची मोहीम तीव्र; क्षेत्रीय कार्यालयनिहाय कारवाईचा आढावा पिंपरी | प्रतिनिधी : दि. 26 मे 2026           ...

पुण्यात मुस्लिम समाजाची गाईला ‘राष्ट्रीय प्राणी’ घोषित करण्याची मागणी

सामाजिक सलोखा, शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पुणे | प्रतिनिधी : दि. 26 मे 2026               ...

पुणे शहर काँग्रेसच्या नवनिर्वाचित शहराध्यक्षांचा जनहित जागृती मंचतर्फे सत्कार

डॉ. विश्वजीत कदम यांना शॉल व संविधान पुस्तक भेट देत मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव बोपोडी | प्रतिनिधी : दि. 23 मे 2026         ...

error: Content is protected !!