HomeपुणेE-चलन आणि PTP ॲपच्या कथित गैरवापराविरोधात परिवहन क्षेत्र आक्रमक ; महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट...

E-चलन आणि PTP ॲपच्या कथित गैरवापराविरोधात परिवहन क्षेत्र आक्रमक ; महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट ॲक्शन कमिटीचे आंदोलन

रिक्षा, कॅब, ट्रक, टेम्पो व बस चालकांचा सहभाग ; निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

पुणे | प्रतिनिधी : दि. ५ मार्च २०२६                          E-चलन प्रणाली तसेच वाहतूक पोलिसांकडून वापरल्या जाणाऱ्या PTP ॲपच्या कथित गैरवापराविरोधात आज विविध परिवहन संघटनांनी एकत्र येत तीव्र आंदोलन छेडले. रिक्षा, कॅब, ट्रक, टेम्पो आणि बस या सर्व क्षेत्रातील चालक- मालकांनी आंदोलनात सहभाग घेत प्रशासनाचे लक्ष वेधले.
या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट ॲक्शन कमिटीने केले. संघटनेच्या वतीने निवासी जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. E-चलन प्रक्रियेत पारदर्शकता, PTP ॲपच्या वापराबाबत स्पष्ट नियमावली, तसेच अन्यायकारक कारवाई तात्काळ थांबविण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी डॉ. केशव नाना क्षीरसागर, नितीन पवार, बाबा शिंदे, किरण देसाई यांच्यासह अनेक पदाधिकारी व चालक प्रतिनिधी उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना डॉ. क्षीरसागर यांनी सांगितले की, “वाहतूक क्षेत्रातील कामगारांवर अन्याय होऊ नये, नियम सर्वांसाठी समान असावेत आणि कारवाई पारदर्शक पद्धतीने व्हावी, ही आमची प्रमुख मागणी आहे. मागण्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा पुढील टप्प्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल.”
दरम्यान, प्रशासनाकडून निवेदनाची दखल घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सारसबाग बंद निर्णयावर मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनचा आक्षेप, प्रशासनाने फेरविचार करावा अशी मागणी

“सुरक्षेच्या कारणांचा आधार घेत विशिष्ट समाजाला लक्ष्य केल्याचा संशय” — डॉ. फरहा शेख यांचे निवेदन बोपोडी | प्रतिनिधी : दी. 27 मे 2026 बकरी ईदनंतर पारंपरिक...

खडकी छावणीतील हातगाडी परवाना धारकांना मुदतवाढ द्या, सारथी सोशल फाउंडेशनची मागणी

कागदपत्रे अपूर्ण राहिल्याने अनेक हातगाडी व्यावसायिक अडचणीत; खडकी छावणी परिषदेला निवेदन सादर खडकी | प्रतिनिधी : दी. 26 मे 2026           ...

पीसीएमसीचा अतिक्रमणधारकांना इशारा; १५ दिवसांत पदपथ मोकळे करा, अन्यथा कठोर कारवाई

नागरिकांच्या सुरक्षित व विनाअडथळा प्रवासासाठी महापालिकेची मोहीम तीव्र; क्षेत्रीय कार्यालयनिहाय कारवाईचा आढावा पिंपरी | प्रतिनिधी : दि. 26 मे 2026           ...

पुण्यात मुस्लिम समाजाची गाईला ‘राष्ट्रीय प्राणी’ घोषित करण्याची मागणी

सामाजिक सलोखा, शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पुणे | प्रतिनिधी : दि. 26 मे 2026               ...

पुणे शहर काँग्रेसच्या नवनिर्वाचित शहराध्यक्षांचा जनहित जागृती मंचतर्फे सत्कार

डॉ. विश्वजीत कदम यांना शॉल व संविधान पुस्तक भेट देत मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव बोपोडी | प्रतिनिधी : दि. 23 मे 2026         ...

error: Content is protected !!