Homeपिंपरी चिंचवडपारदर्शकता, सुरक्षा की विकास? हिंजवडी हिल्स फेज-2 मध्ये रंगणार चुरशीची निवडणूक

पारदर्शकता, सुरक्षा की विकास? हिंजवडी हिल्स फेज-2 मध्ये रंगणार चुरशीची निवडणूक

मागील समिती अडीच वर्षांत बरखास्त झाल्यानंतर नव्या नेतृत्वाची निवड; तीन पॅनल आणि एक अपक्ष उमेदवार रिंगणात

हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 10 जून 2026          हिंजवडी हिल्स फेज-2 सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोसायटीतील विविध मूलभूत प्रश्न पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. शनिवार, दि. 13 जून रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत होणाऱ्या मतदानासाठी तीन पॅनल आणि एक अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले असून रहिवाशांमध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे.

संस्थेच्या 19 सदस्यीय व्यवस्थापन समितीसाठी ही निवडणूक होत असून निवडून आलेल्या सदस्यांमधून अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष तसेच इतर पदाधिकाऱ्यांची निवड केली जाणार आहे. संस्थेच्या मतदारांची संख्या मोठी असली तरी अनेक सदनिकाधारक बाहेरगावी वास्तव्यास असल्याने प्रत्यक्ष मतदानात स्थानिक रहिवाशांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
सोसायटीतील रहिवाशांशी संवाद साधताना पाणीगळती, स्वच्छता, सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही यंत्रणा, अंतर्गत रस्त्यांची अवस्था, कचरा व्यवस्थापन, मेंटेनन्स आणि प्रशासनातील पारदर्शकता हे प्रमुख मुद्दे पुढे येत आहेत. अनेक रहिवाशांनी सोसायटीच्या दैनंदिन व्यवस्थापनाशी संबंधित प्रश्नांवर समाधानकारक तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
या निवडणुकीत ‘चेंज मेकर्स पॅनल’ (चिन्ह – माईक), ‘हिंजवडी हिल्स फर्स्ट पॅनल’ (चिन्ह – ओपन बुक), ‘युनिटी पॅनल’ (चिन्ह – साखळी) तसेच एक अपक्ष उमेदवार (चिन्ह – कपाट) मतदारांचा कौल मागत आहेत.
निवडणूक प्रचारादरम्यान विविध पॅनलकडून आपापल्या भूमिका मांडल्या जात आहेत. ‘चेंज मेकर्स पॅनल’ने सोसायटीच्या कारभारात पारदर्शकता आणण्यावर भर देत महत्त्वाचे निर्णय बंद दाराआड न घेता रहिवाशांना विश्वासात घेऊन प्रक्रिया राबविण्याचे आश्वासन दिले आहे.
‘हिंजवडी हिल्स फर्स्ट पॅनल’ ने कचरा व्यवस्थापन, मेंटेनन्स खर्चाचे नियोजन आणि स्वच्छ पाणीपुरवठा यांसारख्या विषयांना प्राधान्य देण्याची भूमिका मांडली आहे.
तर अपक्ष उमेदवाराने सोसायटीचा कारभार लोकशाही पद्धतीने चालविण्यावर भर देत रहिवाशांसाठी सातत्याने उपलब्ध राहण्याचे आश्वासन दिले आहे.
दरम्यान, सोसायटीची मागील व्यवस्थापन समिती आपला पूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्यापूर्वीच अडीच वर्षांत बरखास्त झाल्याने यावेळची निवडणूक विशेष महत्त्वाची मानली जात आहे. नव्याने निवडून येणाऱ्या समितीकडून प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रभावी पावले उचलली जातील, अशी अपेक्षा अनेक रहिवाशांनी व्यक्त केली आहे.
निवडणुकीत कोणत्या पॅनलला किंवा उमेदवाराला रहिवाशांचा कौल मिळणार याचा निर्णय 13 जून रोजी होणार असून सोसायटीच्या भावी प्रशासनाची दिशा ठरविणाऱ्या या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पथविक्रेता कायद्याची अंमलबजावणी टाळून निर्णय घेणे अयोग्य; आयुक्तांनी कायदेशीर प्रक्रियेचे पालन करावे – काशिनाथ...

पथविक्रेता समितीला डावलून हॉकर्स झोनबाबत निर्णय घेऊ नयेत; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा पिंपरी, दि. ९ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने पथविक्रेत्यांशी संबंधित कोणतेही निर्णय घेताना पथविक्रेता (उपजीविकेचे...

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी संजय मराठे यांची नियुक्ती

सांगवी-पिंपळे गुरव परिसरातील पत्रकार बांधवांचे आधारस्तंभ; विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव पुणे | प्रतिनिधी : दी. 8 जून 2026 महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी ज्येष्ठ...

बोपोडी दर्गा प्रकरणी विविध संघटनांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; चौकशी व पुनर्बांधणीची मागणी

बोपोडी | प्रतिनिधी : दि. 6 जून 2026             बोपोडी परिसरातील हजरत शम्सुद्दीन कादरी रहमतुल्लाह अलैह दर्गा पुणे महापालिकेने पाडण्यात...

बोपोडी – खडकी-औंध मधील वाहतूक कोंडी व अतिक्रमणांवर आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचा पाहणी दौरा

नागरिकांना दिलासा देण्यासाठी पोलीस व महापालिका अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी; तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश पुणे | प्रतिनिधी : दी. 5 जून 2026           ...

महामंडळाच्या निवडणुकीत खळबळ! ‘दोन्ही पॅनल एकाच नाण्याच्या दोन बाजू’; अपक्ष उमेदवार शरद लोणकर यांचा...

महामंडळ आणि सदस्यांच्या हितासाठी आठ अपक्ष उमेदवार एकत्र; प्रस्थापितांच्या कारभारावर जोरदार टीका पुणे | प्रतिनिधी : दी. 4 जून 2026 अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या आगामी...

error: Content is protected !!