Homeखडकीखडकी कॅन्टोन्मेंटमध्ये रस्त्याची दुरावस्था, वार्ड ७ मधील ५१२ रोड कामास विलंब, ...

खडकी कॅन्टोन्मेंटमध्ये रस्त्याची दुरावस्था, वार्ड ७ मधील ५१२ रोड कामास विलंब, माजी उपाध्यक्ष भापकर यांचा आंदोलनाचा इशारा

खडकी / प्रतिनिधी : दि. ९ डिसेंबर २०२५              येथील जुना वॉर्ड क्रमांक  ७  मधील राजमोहन चौक ते ५१२ रोड हा गेल्या अनेक महिन्यांपासून  खराब अवस्थेत असून, नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या रस्त्यावर खड्डे पडले असून रस्त्याची चाळण झाली आहे  त्यामुळे स्थानिक रहिवाश्यांचे हाल होत आहे.

या  समस्येबाबत वार्डातील स्थानिक प्रतिनिधी  बोर्डाचे माजी उपाध्यक्ष दुर्योधन भापकर यांनी बोर्डाकडे संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नानंतर सुमारे २० दिवसांपूर्वी रस्ता दुरुस्तीचे वर्कऑर्डर जारी करण्यात आले. मात्र वर्कऑर्डर देऊनही प्रत्यक्ष कामाला आजतागायत सुरुवातच झाली नसल्याचा  आरोप भापकर यांनी केला आहे. भापकर म्हणाले की, “मी वारंवार पाठपुरावा करूनही माझ्या वार्डातील या रस्त्याचे काम जाणूनबुजून थांबवले जात आहे. नागरिकांना या रस्त्यामुळे दररोज त्रास सहन करावा लागतो. प्रशासन जाणूनबुजून कामात दिरंगाई करत  आहे. येत्या दोन दिवसांत या रस्त्याचे काम सुरू न झाल्यास नागरिकांना सोबत घेऊन मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन केले जाईल.”
दरम्यान, वार्ड क्रमांक ७ हा खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डातील महत्त्वाचा वर्दळीचा परिसर असल्यामुळे या रस्त्याचा वापर शाळकरी विद्यार्थी, कामगार ज्येष्ठ नागरिक करत असतात.  येथील नागरिकांनीही प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त करत तात्काळ काम सुरू करण्याची मागणी केली आहे.
आता खडकी कॅन्टोन्मेंट च्या संबंधित विभागाकडून प्रत्यक्ष कामाला कधी सुरुवात होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!