Homeपुणेपुणे भाजप कार्यालयात उमेदवारी अर्जांचा महापूर; पहिल्याच दिवशी 2000 अर्ज

पुणे भाजप कार्यालयात उमेदवारी अर्जांचा महापूर; पहिल्याच दिवशी 2000 अर्ज

पुणे /  पुणे पीसीएमसी न्यूज नेटवर्क :          महापालिका निवडणुकीच्या तयारीला वेग येत असताना, पुणे शहर भाजप कार्यालयात आज उमेदवारी अर्ज घेण्याच्या पहिल्या दिवशी प्रचंड गर्दी उसळली. सकाळपासून कार्यकर्ते व इच्छुक उमेदवारांची रांग लागल्याचे चित्र पहावयास मिळाले. पक्षाच्या माहितीनुसार, पहिल्याच दिवशी तब्बल २००० अर्ज जमा झाले आहेत.

भाजप शहर अध्यक्ष धीरज घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली. उमेदवार इच्छुकांनी प्रभागनिहाय अर्ज सादर करताना स्वतःची कामगिरी, समाजकार्य, स्थानिक संपर्क असे विविध तपशील जोडले. काही प्रभागांमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त अर्ज आले असून, पक्षांतर्गत स्पर्धा तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपा कार्यालयातील पदाधिकाऱ्यांनी  सांगितले की, अर्जांची प्राथमिक छाननी पूर्ण झाल्यानंतर जिल्हा व राज्यस्तरीय समितीकडे प्रस्ताव पाठवले जातील. पुढील काही दिवसांत मुलाखती, शेरा तपासणी आणि स्थानिक स्तरावरील मतमतांतरे पाहून  प्रदेश कार्यकारिणी कडे नावे पाठवली जातील त्यानंतर उमेदवारांची अंतिम निवड केली जाणार आहे.
पुण्यातील 165 प्रभागांसाठी उमेदवारीची प्रक्रिया सुरू झाल्याने शहरातील राजकीय वातावरण तापले असून, भाजपच्या प्रतिसादामुळे इतर पक्ष देखील त्यांच्या यादीच्या तयारीला वेग देणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!