पुणे पीसीएमसी न्यूज24:Live
खडकी : पुणे पीसीएमसी न्यूज:24 डेस्क न्यूज / हरीश शर्मा
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या लालबहादूर शास्त्री शाळेच्या आवारात असलेली ‘सुरेश हेमराज गांधी मित्र सागर ट्रस्ट’ ही व्यायाम शाळा गेल्या बावीस वर्षांपासून खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी सदस्य तुषार गांधी यांच्याकडे असून गांधी यांनी सदर व्यायामशाळा व्यावसायिक कारणासाठी वापर करत असल्याचा आरोप खडकीतील सामाजिक कार्यकर्ता शहाबाज एस सय्यद यांनी केला असून त्याबाबतचे पत्र त्यांनी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनाक्षी लोहिया , खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष, संरक्षण मालमत्ता महासंचालक नवी दिल्ली, पुणे प्रधान संचालनालय यांना दिले आहे.
बोर्डाच्या व्यायामशाळेचे वयावसायिकीकरण
पत्रात त्यांनी सांगितले आहे की आमदार निधी आणि संरक्षण संचालनालय सदर्न कमांड पुणे यांनी एक जानेवारी २००४ रोजी काही अटी शर्ती नियमानुसार कॅन्टोन्मेंट नियमानुसार मालमत्तेच्या सदर्भात पाच वर्षापर्यंत ग्रँड लीज करण्यास सक्षम असलेल्या मंडळाला देण्यात आली होती पाच वर्षानंतर वाजवी भाडेवाढ करून पुढील पाच वर्षांसाठी लिजचे नूतनीकरण करता येईल मात्र २००४ पासून ते आजतागायत ही व्यायामशाळा मित्र सागर ट्रस्ट चे अध्यक्ष बोर्डाचे माजी सदस्य तुषार गांधी यांच्याकडेच त्याचा ताबा आहे.व त्यांनी सदर व्यायामशाळा खाजगी व्यक्तीना भाड्याने दिली आहे. तळमजल्यावर व्यायामशाळा व पहिल्या मजल्यावर खाजगी अध्यापन वर्ग ( वलासेस ) तसेच त्यापोटी त्यांना व्यायामशाळेसाठी पंचवीस हजार रुपये दरमहा मिळत असून व्यायाम शाळा चालवणारी खाजगी वयकी व्यायाम करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून एक हजार रुपये घेत आहेत, तसेच खाजगी क्लास चाणक्य अकादमी जी दरमहा तीस हजार रुपये भाडे देत आहे, असा एकूण नफा गांधी याना मिळत असल्याचेही सय्यद यांनी पत्रात नमूद केले आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्ड च्या जमिनीवर आमदार निधीतून उभारलेल्या या व्यायामशाळेच खडकीतील सर्वसामान्य नागरीकांना कोणताही फायदा होत नसल्याने खडकी बोर्डाने याची शहानिशा करून बोर्डाने सदर व्यायामशाळा बोर्डाच्या ताब्यात घ्यावी व सर्वसामान्य नागरिकांना याचा कसा फायदा होईल त्या पद्धतीने पुढील कृती करावी अशी मागणी ही शहाबाज सय्यद यांनी बोर्डाकडे केली आहे.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏






















