Homeखडकीखडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या लाल बहादूर शाळा परिसरातील व्यायामशाळा तब्बल बावीस वर्षे एकाच...

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या लाल बहादूर शाळा परिसरातील व्यायामशाळा तब्बल बावीस वर्षे एकाच व्यक्तीकडे

पुणे पीसीएमसी न्यूज24:Live

खडकी :  पुणे पीसीएमसी न्यूज:24 डेस्क न्यूज / हरीश शर्मा 

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या लालबहादूर शास्त्री शाळेच्या आवारात असलेली ‘सुरेश हेमराज गांधी मित्र सागर ट्रस्ट’ ही व्यायाम शाळा गेल्या बावीस वर्षांपासून खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी सदस्य तुषार गांधी यांच्याकडे असून गांधी यांनी सदर व्यायामशाळा व्यावसायिक कारणासाठी वापर करत असल्याचा आरोप खडकीतील सामाजिक कार्यकर्ता शहाबाज एस सय्यद यांनी केला असून त्याबाबतचे पत्र त्यांनी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनाक्षी लोहिया , खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष, संरक्षण मालमत्ता महासंचालक नवी दिल्ली, पुणे प्रधान संचालनालय यांना दिले आहे.

बोर्डाच्या व्यायामशाळेचे वयावसायिकीकरण

पत्रात त्यांनी सांगितले आहे की  आमदार निधी आणि संरक्षण संचालनालय सदर्न कमांड पुणे यांनी एक जानेवारी २००४ रोजी काही अटी शर्ती नियमानुसार कॅन्टोन्मेंट नियमानुसार मालमत्तेच्या सदर्भात पाच वर्षापर्यंत ग्रँड लीज करण्यास सक्षम असलेल्या मंडळाला देण्यात आली होती पाच वर्षानंतर वाजवी भाडेवाढ करून पुढील पाच वर्षांसाठी लिजचे नूतनीकरण करता येईल मात्र २००४ पासून ते आजतागायत ही व्यायामशाळा मित्र सागर ट्रस्ट चे अध्यक्ष बोर्डाचे माजी सदस्य तुषार गांधी यांच्याकडेच त्याचा ताबा आहे.व त्यांनी सदर व्यायामशाळा खाजगी व्यक्तीना भाड्याने दिली आहे. तळमजल्यावर व्यायामशाळा व पहिल्या मजल्यावर खाजगी अध्यापन वर्ग ( वलासेस ) तसेच त्यापोटी त्यांना व्यायामशाळेसाठी पंचवीस हजार रुपये दरमहा मिळत असून व्यायाम शाळा चालवणारी खाजगी वयकी  व्यायाम करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून एक हजार रुपये घेत आहेत, तसेच खाजगी क्लास चाणक्य अकादमी जी दरमहा तीस हजार रुपये भाडे देत आहे, असा एकूण नफा गांधी याना मिळत असल्याचेही सय्यद यांनी पत्रात नमूद केले आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्ड च्या जमिनीवर आमदार निधीतून उभारलेल्या या व्यायामशाळेच खडकीतील सर्वसामान्य नागरीकांना कोणताही फायदा होत नसल्याने खडकी बोर्डाने याची शहानिशा करून  बोर्डाने सदर व्यायामशाळा बोर्डाच्या ताब्यात घ्यावी व सर्वसामान्य नागरिकांना याचा कसा फायदा होईल त्या पद्धतीने पुढील कृती करावी अशी मागणी ही शहाबाज सय्यद यांनी बोर्डाकडे केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!