पुणे पीसीएमसी न्यूज 24 : पिंपरी / प्रतिनिधी
रक्षाबंधन हा बहीण – भावाच्या प्रेमाचा पवित्र सण असून, या दिवशी अनेक महिला व मुली आपल्या माहेरी, भावाकडे किंवा गावी जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून असतात. मात्र या दिवशी प्रवासी संख्येमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याने अनेक महिलांना उभं राहून प्रवास करावा लागतो किंवा वाहनांच्या प्रतीक्षेत वेळ वाया जातो. या पार्श्वभूमीवर दुर्गा ब्रिगेड संघटनेच्या महाराष्ट्र राज्याच्या संस्थापक अध्यक्ष दुर्गा भोर यांनी शासनाकडे व परिवहन विभागाकडे “रक्षाबंधन दिवशी राज्यभर महिलांसाठी एसटी, पीएमपीएल व अन्य सार्वजनिक बससेवा मोफत करावी आणि बसची संख्या वाढवावी.” अशी मागणी केली आहे.
रक्षाबंधनाच्या दिवशी लाडक्या बहिणींना एक दिवसाचा सन्मान म्हणून राज्य सरकारने मोफत बस सेवा जाहीर करावी, ही सामाजिक न्यायाची आणि स्त्रीसन्मानाची खरी अभिव्यक्ती ठरेल. – दुर्गा भोर – संस्थापक अध्यक्ष दुर्गा ब्रिगेड संघटना
याचबरोबर भोर यांनी काही मागण्या प्रशासनाकडे केल्या आहेत ‘रक्षाबंधनच्या दिवशी (09 ऑगस्ट २०२५) सर्व महिलांना मोफत बससेवा उपलब्ध करून द्यावी. पीएमपीएल, एसटी व नगरपालिका बस विभागांनी महिलांसाठी विशेष जादा गाड्या चालवाव्यात. ग्रामीण व निमशहरी भागातही या सेवेचा लाभ मिळेल याची दक्षता घ्यावी. बस स्थानकांवर सुरळीत व्यवस्थापनासाठी अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करावे महिलांचा सन्मान करणारे हे पाऊल शासनाने उचलावे, जेणेकरून राज्यभरातील लाखो महिलांना प्रवास सुलभ, सुरक्षित व सन्मानपूर्वक करता येईल. अश्या मागण्या दुर्गा भोर यांनी प्रशासनापुढे मांडल्या आहेत.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏



















