Homeपुणे‘विनायकी : विनायक निम्हण गौरव शिष्यवृत्ती’साठी ऑनलाइन अर्ज सुरू; १५ जुलै अंतिम...

‘विनायकी : विनायक निम्हण गौरव शिष्यवृत्ती’साठी ऑनलाइन अर्ज सुरू; १५ जुलै अंतिम मुदत

गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ; ५ ऑगस्ट रोजी बालगंधर्व येथे शिष्यवृत्ती वितरण

पुणे | प्रतिनिधी : दि. 10 जुलै 2026                   स्व. माजी कार्यसम्राट आमदार विनायक (आबा) निम्हण यांच्या जयंतीनिमित्त सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने सलग चौथ्या वर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘विनायकी : विनायक निम्हण गौरव शिष्यवृत्ती’ उपक्रमासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र व गुणवंत विद्यार्थ्यांनी ५ जुलै ते १५ जुलै २०२६ या कालावधीत www.sunnynimhan.com या संकेतस्थळावर अर्ज करावेत, असे आवाहन नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी केले आहे.

स्व. विनायक (आबा) निम्हण यांनी शिक्षण, आरोग्य, कला आणि सामाजिक विकास या क्षेत्रांना नेहमीच प्राधान्य दिले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांचे शिक्षण आर्थिक कारणांमुळे थांबू नये, हा त्यांचा कायम प्रयत्न होता. त्यांच्या याच सामाजिक विचारांचा वारसा जपत सोमेश्वर फाउंडेशनतर्फे विविध शैक्षणिक, सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत.

‘विनायकी : विनायक निम्हण गौरव शिष्यवृत्ती’ हा उपक्रम केवळ आर्थिक मदत देणारा नसून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा गौरव करणारा आणि त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला नवी दिशा देणारा उपक्रम आहे. पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला बसलेल्या पण थोडक्यात शिष्यवृत्ती हुकलेल्या विद्यार्थ्यांसह पदवी, पदव्युत्तर, डिप्लोमा, पीएच.डी., तसेच आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, मेडिकल, इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, कृषी, फार्मसी, मॅनेजमेंट, लॉ आणि जर्नालिझम अशा विविध शाखांतील गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

गेल्या तीन वर्षांत या उपक्रमाला विद्यार्थी, पालक आणि शिक्षण क्षेत्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून अनेक विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाला या शिष्यवृत्तीमुळे आर्थिक आधार मिळाला आहे. यंदाही अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत या उपक्रमाचा लाभ पोहोचावा, यासाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन ठेवण्यात आली आहे.

ऑनलाइन अर्ज केल्यानंतर पात्र विद्यार्थ्यांच्या मुलाखती १८, १९ आणि २६ जुलै २०२६ रोजी सोमेश्वर फाउंडेशन कार्यालय, शिवाजीनगर येथे घेण्यात येणार आहेत. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव ५ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे आयोजित भव्य शिष्यवृत्ती वितरण समारंभात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

“झेप तुमची… साथ आमची!” या ब्रीदवाक्याखाली राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमासाठी पात्र विद्यार्थ्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता तात्काळ ऑनलाइन अर्ज करावा, तसेच पालक, शिक्षक, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संघटनांनी ही माहिती अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी केले आहे.

महत्त्वाची माहिती :

  • ऑनलाइन अर्ज कालावधी : ५ जुलै ते १५ जुलै २०२६
  • संकेतस्थळ : www.sunnynimhan.com
  • संपर्क : 8308 123 555
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!