Homeमहाराष्ट्रभ्रष्ट परिवहन विभागाकडे प्रधानमंत्रींचे लक्ष वेधण्यासाठी — महाराष्ट्रातील कॅब, टॅक्सी व रिक्षा...

भ्रष्ट परिवहन विभागाकडे प्रधानमंत्रींचे लक्ष वेधण्यासाठी — महाराष्ट्रातील कॅब, टॅक्सी व रिक्षा चालकांचा ९ ऑक्टोबरला एकदिवसीय बंद”

पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live

पुणे / प्रतिनिधी : दिनांक  ५ ऑक्टोबर
भारतीय गिग कामगार मंच च्या वतीने ९ ऑक्टोबर २०२५ रोजी राज्यभरातील कॅब, टॅक्सी व रिक्षा चालकांनी प्रवासी सेवा एक दिवसासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या बंदचा उद्देश म्हणजे परिवहन विभागातील कथित भ्रष्टाचाराकडे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधणे, असा मंच चा इशारा आहे.
१५ जुलैपासून मुंबईतील आझाद मैदानावर या चालकांचे आंदोलन सुरू असून, परिवहन विभागाच्या गैरव्यवहारांविरोधात उपोषण, निदर्शने, बंद अशा विविध मार्गांनी हे आंदोलन सुरू आहे.
मंच चा आरोप आहे की, ओला, उबेर व रॅपिडो या  अँप आधारित कंपन्या सरकारी नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीर प्रवासी सेवा चालवत आहेत. अनेक एफ.आय.आर दाखल झाल्यानंतरही या कंपन्यांविरुद्ध कोणतीही ठोस कारवाई होत नाही.
३० सप्टेंबर रोजी परिवहन मंत्र्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेण्यास नकार दिल्याने शेकडो चालकांनी “जेलभरो आंदोलन” करत स्वतःला अटक करून घेतले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या सचिवांनी बैठक घेऊन उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, संघटनेच्या म्हणण्यानुसार परिवहन विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.
मंच चा आरोप आहे की, परिवहन मंत्री यांनी रॅपिडो कंपनीकडून घेतलेल्या स्पॉन्सरशिपमुळे विभागातील अधिकारी निष्क्रीय झाले आहेत आणि कंपन्यांसमोर झुकत आहेत.
जुलै महिन्यातील आंदोलनादरम्यान 100% चालकांनी बंदमध्ये सहभाग घेतला होता, त्यावेळी विमानतळ प्रशासनाने नागरिकांना स्वतःच्या वाहनांची व्यवस्था करून ठेवण्याचे आवाहन केले होते.
९ ऑक्टोबरला जेव्हा देशभरातील वित्ततज्ञ मुंबईत एका महत्त्वाच्या कॉन्फरन्ससाठी येणार आहेत, त्याच दिवशी हा बंद होणार आहे. त्यामुळे या आंदोलनातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे लक्ष परिवहन विभागाच्या गलथान कारभाराकडे वळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या बंददरम्यान सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर ताण येण्याची शक्यता असून नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोय होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

भारतीय गिग कामगार मंच चे नेते डॉ.केशव नाना क्षीरसागर यांचं असं मत:आहे की
“आमचे मागील तीन महिन्यांपासून सुरू असलेले आंदोलन हे सर्वसामान्य चालकांच्या न्यायासाठी आहे. सरकार आणि परिवहन विभाग जर भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष करत राहिले, तर आम्ही आणखी तीव्र आंदोलन करू.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!