पुणे / प्रतिनिधी : दि. २३ नोव्हेंबर २०२५ तामिळनाडूमध्ये होणाऱ्या एफआयएच पुरुष हॉकी ज्युनियर वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेच्या ट्रॉफीचे पुण्यात उत्साहात स्वागत करण्यात आले. सेंट व्हिन्सेंट उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मैदानावर आयोजित मुख्य समारंभात राज्य मंत्री मुरलीधर मोहोल यांनी उपस्थितांना संबोधित केले.
“ही ट्रॉफी भारतातच राहील अशी माझी मनापासून अपेक्षा आहे. पुण्याने हॉकी क्षेत्रात देशाला अनेक दिग्गज दिले आहेत. धनराज पिल्ले, विक्रम पिल्ले यांसारख्या खेळाडूंनी पुण्याची प्रतिष्ठा जागतिक स्तरावर वाढवली,” असे मोहोळ म्हणाले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अतिरिक्त पोलिस महासंचालक (फोर्स वन) आणि हॉकी महाराष्ट्रचे अध्यक्ष कृष्ण प्रकाश आयपीएस यांनी भूषवले. यावेळी हॉकी इंडियाचे सहयोगी उपाध्यक्ष मनोज भोरे आणि हॉकी महाराष्ट्रचे सरचिटणीस मनीष आनंद यांनीही ट्रॉफीचे स्वागत केले.
मोहोळ पुढे म्हणाले, “पिल्ले परिवाराने आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक विक्रम रचले आहेत. सध्या पुण्यातील दहा विद्यार्थी राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरात सहभागी आहेत, ही शहरासाठी अभिमानाची बाब आहे. हॉकीपटूंना आवश्यक सुविधा देण्यासाठी मी आणि महाराष्ट्र संघटना पूर्ण सहकार्य करणार आहोत.”
कृष्ण प्रकाश म्हणाले, “ट्रॉफी टूरचा उद्देश हॉकीचा अधिक प्रसार करणे आणि मेजर ध्यानचंद यांच्यासह देशातील महान खेळाडूंना अभिवादन करणे हा आहे. हॉकी हा केवळ खेळ नसून डिसिप्लिन, फिटनेस आणि मेडिटेशन यांचा संगम आहे. भारताची युवा शक्ती प्रबळ असून पुढील ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याची क्षमता नक्कीच अधिक आहे.”
या कार्यक्रमास विक्रम पिल्ले, रमेश पिल्ले, विकास पिल्ले, पूजा आनंद, वारिदा शेख, संजय शेट, मनीषा साखरे, फादर टायटस प्राचार्य सेंट व्हिन्सेंट विद्यालय, सिस्टर लैला प्राचार्या सेंट एन्स हायस्कूल यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

ट्रॉफी टूरचा पुण्यात उत्साहात समारोप
ट्रॉफी टूरची सुरुवात संत तुकाराम हायस्कूल, लोहगाव येथे झाली. तीन शाळांतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत ट्रॉफीचे स्वागत केले. त्यानंतर ट्रॉफी खडकी बाजार येथील एमएसइबी चौक, साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे चौक , महात्मा गांधी चौक मार्गे कर्नल भगत शाळेमध्ये पोहोचली.
यानंतर ट्रॉफीला रॅलीच्या माध्यमातून सेंट व्हिन्सेंट मैदानावर नेण्यात आले, जिथे मुख्य कार्यक्रम पार पडला. समारोपानंतर ट्रॉफी पुढील टप्प्यासाठी पुण्यातून हैदराबादला रवाना झाली.


मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏

















