पुणे / प्रतिनिधी : दि. २४ नोव्हेंबर २०२५ आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा झेंडा उंचावणारे पॉवरलिफ्टर श्याम साहनी यांना जगातील सर्वोत्तम पॉवरलिफ्टर म्हणून मानाचा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स तर्फे हा गौरव २२ नोव्हेंबर रोजी विशेष सोहळ्यात देण्यात आला.
श्याम साहनी गेली १२ वर्षे पुणे जिल्हा आणि महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग तसेच बेंचप्रेस स्पर्धांमध्ये सलग सुवर्णपदक पटकावत आहेत. आंतरराष्ट्रीय मंचावरही त्यांनी मोठे यश मिळवत ८ सुवर्णपदके आपल्या नावावर केली आहेत.
२०१८ मध्ये मंगोलिया येथे झालेल्या वर्ल्ड मास्टर्स चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी ब्रॉन्झ मेडल जिंकले होते. तर २०२३ मध्ये न्यूझीलंड येथे पार पडलेल्या कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी अव्वल कामगिरी करत ४ रौप्यपदकांची कमाई केली आणि भारताचा गौरव वाढविला.
सन्मानाचे मानकरी
फिरोज खान, चेअरमन – इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स
अजीत सिंह, चेअरमन – न्यू पुना क्लब
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे
निवृत्त एसीपी अरविंद पाटील
अॅड. श्रीकांत माळेगावकर
राजू मनसुरामाणी
श्याम साहनी यांच्या सातत्यपूर्ण परिश्रम, कष्टसाध्य प्रशिक्षण आणि उत्कृष्ठ कामगिरीमुळे भारतीय पॉवरलिफ्टिंग क्षेत्रात त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या जागतिक सन्मानामुळे पुणे जिल्हा आणि महाराष्ट्राचा लौकिक अधिक उज्वल झाला आहे.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏

















