बोपोडी | प्रतिनिधी : दि. 31 जानेवारी 2026
बोपोडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आज शोकमय वातावरणात न्हाऊन निघाला होता. महाराष्ट्राच्या राजकारणात जनसामान्यांचे नेतृत्व करणारे स्वर्गीय अजित पवार यांच्या दुःखद निधनानिमित्त येथे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोकसभेत नागरिकांच्या भावना अनावर झाल्या होत्या आणि संपूर्ण परिसरात दुःखाची शांत छाया पसरली होती.
या शोकसभेस विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, धार्मिक प्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. हिंदू, मुस्लिम, शीख, बौद्ध, ख्रिश्चन समाजातील नागरिक एकत्र येत अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करताना दिसून आले. राजकीय मतभेद विसरून सर्व समाज घटक एकत्र आल्याचे चित्र येथे पाहायला मिळाले.
कार्यक्रमास ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड. एस. के. जैन, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते ॲड. निलेश निकम, नगरसेवक परशुराम वाडेकर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील, माजी नगरसेवक आनंद छाजेड, प्रकाश ढोरे, कैलास गायकवाड, नंदलाल धीवर, ज्ञानेश्वर मुरकुटे (माजी अध्यक्ष पीएमटी), राजेंद्र भूतडा, ॲड. रमेश पवळे, विनोद रणपिसे, अनिल भिसे, विशाल जाधव, अनवर शेख यांच्यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते.
याशिवाय करिम शेख, अमित जावीर, विजय जाधव, शशिकांत पांडुळे, प्रशांत टेके, इंद्रजित भालेराव, रविंद्र गायकवाड, पोपट खंडागळे, दत्तात्रय सूर्यवंशी, दादासाहेब रणपिसे, रोहित भिसे, केतन गायकवाड, गणेश सारवान, विकास कांबळे, निलेश मोरे, अजित थेरे, आदित्य ओव्हाळ, कुशल घागट, विठ्ठल आरुडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली.
महिलांमध्ये मनिषा ओव्हाळ, अंजली दिघे, ज्योती परदेशी, सुंदर ओव्हाळ, रेश्मा कांबळे, अख्तरी शेख, भाग्यश्री गाढवे, ज्योती भिसे, शेंवता नाटेकर, दिलशाद अत्तर, फरिदा शेख, तृप्ती घोडके, रविंद्र कांबळे आणि मुस्कान अत्तर सहभागी झाल्या होत्या.

शोकसभेत विविध धर्मांचे प्रतिनिधी – मौलाना, बौद्धाचार्य, फादर व अन्य धर्मगुरूंनी उपस्थित राहून दिवंगत आत्म्यास श्रद्धांजली अर्पण केली. तसेच सुनील टकावणे, श्रीधर गायकवाड, विनोद मुरार, अफजल शेख आणि बाळासाहेब रानवडे यांनीही सहभाग नोंदवला.
यावेळी ॲड. निलेश निकम यांनी आपल्या भाषणात सांगितलेला एक हृदयस्पर्शी अनुभव उपस्थितांच्या काळजाला चटका लावून गेला. गटनेतेपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर ते दररोज रात्री आठ वाजता अजित पवार यांच्याशी फोनवर संवाद साधत असत. मात्र एका दिवशी कामाच्या व्यापामुळे फोन होऊ शकला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसातपासून त्यांनी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण मोबाईल सतत स्विच ऑफ येत होता. सकाळी नऊच्या सुमारास अजित पवार यांच्या हवाई प्रवासादरम्यान अपघात झाल्याची व त्यात त्यांच्या निधनाची बातमी समजली.
हा अनुभव सांगताना ॲड. निलेश निकम भावुक झाले. त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळताच सभागृहातील अनेक नागरिकांचे डोळे पाणावले. काही क्षणांसाठी संपूर्ण परिसरात गूढ शांतता पसरली होती.
या सर्वपक्षीय शोकसभेतून अजित पवार हे केवळ एका पक्षाचे नेते नव्हते, तर सर्व समाजाचे लोकनेते होते, ही भावना पुन्हा एकदा ठळकपणे समोर आली.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी दोन मिनिटांचे मौन पाळून दिवंगत आत्म्यास श्रद्धांजली अर्पण केली आणि त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करण्यात आली.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏

















