Homeपुणेयुवकांच्या ताकदीतून अमली पदार्थांविरोधात एल्गार !

युवकांच्या ताकदीतून अमली पदार्थांविरोधात एल्गार !

पुण्यात १२ इनर व्हील क्लब्सकडून भव्य जनजागृती अभियान

पुणे | प्रतिनिधी : दि. 3 फेब्रुवारी 2026            अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याविरोधात युवकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी पुण्यात प्रभावी पाऊल उचलण्यात आले. २ फेब्रुवारी रोजी पुण्यातील मॉडर्न कॉलेज, गणेशखिंड येथे आयोजित युवक महोत्सवात पुणे शहरातील १२ इनर व्हील क्लब्सच्या संयुक्त विद्यमाने VIVIDAA या व्यासपीठावर भव्य अमली पदार्थविरोधी जनजागृती अभियान राबविण्यात आले.

या अभियानात प्रभावी फलक, माहितीपूर्ण पोस्टर्स, ठोस घोषवाक्ये तसेच संवादात्मक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. इनर व्हील क्लबच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत व्यसनमुक्त, सकारात्मक आणि आरोग्यदायी जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित केले.
या उपक्रमाला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेक विद्यार्थ्यांनी इनर व्हीलच्या सदस्यांसोबत एकत्र येत अमली पदार्थांविरोधात जोरदार घोषणा दिल्या. “Say No to Drugs” अशी सामूहिक प्रतिज्ञा घेत युवकांनी स्वतः पुढाकार घेत समाजातील या गंभीर समस्येविरोधात जबाबदारी स्वीकारण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला.
या जनजागृती उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि जबाबदारीची भावना अधिक दृढ झाली. युवकांच्या सक्रिय सहभागातून साकारलेला हा उपक्रम केवळ जनजागृतीपुरता मर्यादित न राहता युवकप्रेरित सामाजिक चळवळीचे स्वरूप घेणारा ठरला. इनर व्हील क्लब्सच्या संयुक्त प्रयत्नातून राबविण्यात आलेला हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी आणि अनुकरणीय ठरत आहे.
या उपक्रमात सहभागी इनर व्हील क्लब्स :
पुणे डाऊनटाउन, पुणे विंग्ज, निगडी प्राईड, IWC पुणे, पुणे इम्पिरियल, पुणे अपटाउन, पुणे प्लॅटिनम, बाणेर हिल्स, पूना नॉर्थ, पुणे रिव्हर रिदम, पुणे रिव्हरसाईड आणि पुणे सेंट्रल. Pune Genz

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!