इनर व्हील क्लब्स ऑफ पुणे डिस्ट्रिक्टचा समाजभान जपणारा संयुक्त उपक्रम
पुणे | प्रतिनिधी : १४ जानेवारी २०२६
जागतिक ब्रेल दिनानिमित्त दृष्टिहीन व्यक्तींच्या स्वावलंबनाला बळ देणारा एक अत्यंत अर्थपूर्ण आणि समाजोपयोगी उपक्रम पुण्यात राबविण्यात आला. इनर व्हील क्लब्स ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट यांच्या पुढाकाराने आणि नॅशनल फेडरेशन ऑफ द ब्लाइंड यांच्या सहकार्याने दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी 506 दृष्टिहीन व्यक्तींना व्हाईट केन (पांढरी काठी) वितरित करण्यात आली.
या कार्यक्रमास डिस्ट्रिक्ट चेअरमन डॉ. आशा देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच पुणे व परिसरातील विविध इनर व्हील क्लब्सचे प्रेसिडेंट्स व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे या उपक्रमाला सामाजिक बांधिलकीचा ठसा अधिक ठळकपणे लाभला.
व्हाईट केन ही केवळ चालण्याची काठी नसून ती दृष्टिहीन व्यक्तींसाठी स्वातंत्र्य, सुरक्षितता, आत्मविश्वास आणि स्वावलंबनाचे प्रतीक आहे. नॅशनल फेडरेशन ऑफ द ब्लाइंड यांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या व गरजू लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. संपूर्ण प्रकल्पाची अंमलबजावणी पारदर्शक, शिस्तबद्ध व सन्मानपूर्वक करण्यात आली.
या संयुक्त प्रकल्पात पुढील इनर व्हील क्लब्सचा सक्रिय सहभाग लाभला :
IWC Poona North, IWC Puna Platinum, IWC Pune River Rhythms, IWC Nigdi Pride, IWC Baner Hills, IWC Pune Wings, IWC Bhor, IWC Poona Downtown, IWC Pune Uptown, IWC Pune Riverside, IWC Pune Queens, IWC Beed, IWC Pune, IWC Wai, IWC Panchgani ,IWC JALNA, IWC JALNA CENTRAL, IWC JALNA HORIZON*
या उपक्रमासाठी एकूण ₹1,26,500/- इतका खर्च करण्यात आला असून 506 लाभार्थ्यांना थेट लाभ मिळाला आहे. हा प्रकल्प कौटुंबिक कल्याण या वर्गात राबविण्यात आला.
जागतिक ब्रेल दिनानिमित्त राबविण्यात आलेला हा उपक्रम इनर व्हील क्लब्सच्या मानवतावादी दृष्टिकोन, सामाजिक बांधिलकी आणि समावेशक विकासाच्या कटिबद्धतेचे जिवंत उदाहरण ठरत आहे.
या उपक्रमासाठी मार्गदर्शन व सहकार्य केल्याबद्दल नॅशनल फेडरेशन ऑफ द ब्लाइंड, कार्यक्रमास उपस्थित असलेले सर्व मान्यवर, क्लब प्रेसिडेंट्स, सदस्य आणि समर्थकांचे इनर व्हील क्लब्स ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट तर्फे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏

















