Homeपुणेविकास की डावपेच? प्रभाग ७ - ८ मध्ये मतदानाआधीच कुजबुज, मतदार...

विकास की डावपेच? प्रभाग ७ – ८ मध्ये मतदानाआधीच कुजबुज, मतदार सतर्क “शेवटच्या क्षणी खेळ बदलतोय?”

पुणे | प्रतिनिधी : दि. १४ जानेवारी २०२६
सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या प्रचाराचा आज, १३ जानेवारी रोजी अधिकृतपणे शेवट झाला असून आता संपूर्ण शहराचे लक्ष १५ जानेवारीच्या मतदानाकडे लागले आहे.
विशेषतः प्रभाग क्रमांक ७ आणि ८ मध्ये शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळाले.
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी या दोन प्रभागांत कॉर्नर मीटिंग्स, घरोघरी भेटी, गुप्त बैठका, आरोप-प्रत्यारोप आणि शक्तिप्रदर्शन यांचा अक्षरशः पाऊस पडला.
एकीकडे विकासाची आश्वासने, तर दुसरीकडे एकमेकांवर थेट हल्ले – त्यामुळे मतदार संभ्रमात की संतप्त, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

प्रभाग 7 आणि 8 – ‘हॉट सीट’ का?
●पक्षीय उमेदवारांमध्ये अंतर्गत नाराजी
●अपक्ष उमेदवारांची अनपेक्षित मुसंडी
●मागील प्रतिनिधींविरोधात उघड जनअसंतोष
●शेवटच्या टप्प्यात धक्कादायक समीकरणे बदलण्याची शक्यता
●विशेष म्हणजे, प्रचार संपल्यानंतरही पडद्यामागील हालचाली सुरूच असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
काही ठिकाणी मतदारांवर दबाव, तर काही ठिकाणी “शांत प्रचार” नावाखाली रणनीती राबवल्याची कुजबुजही ऐकू येत आहे.
१५ जानेवारी – निर्णयाचा दिवस
आता प्रचार थांबला असला, तरी खरा सामना मतदानाच्या दिवशीच होणार आहे.
प्रभाग ७ आणि ८ मध्ये मतदार राजा कोणाच्या पारड्यात कौल देतो, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
प्रचाराचा गदारोळ थांबला, पण राजकीय भूकंपाची चाहूल मात्र लागली आहे!
१५ जानेवारीनंतर निकालाच्या दिवशी अनेकांचे चेहरे उजळतील, तर काहींच्या राजकीय स्वप्नांना तडा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

■काही उमेदवारांविरोधात मतदारांकडून तीव्र नाराजी व्यक्त
■शेवटच्या क्षणी रणनीती बदलल्याच्या जोरदार चर्चा
■अपक्ष उमेदवारांमुळे पारंपरिक समीकरणे कोलमडण्याची शक्यता
■प्रचार बंदीनंतरही पडद्यामागील हालचाली सुरू असल्याची कुजबुज

या दोन प्रभागांत प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात अचानक वाढलेल्या हालचाली, गुप्त बैठका, दिशाभूल करणाऱ्या अफवा आणि अनपेक्षित समीकरणांमुळे मतदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
“विकास” आणि “लोकहित” या शब्दांचा गवगवा झाला, पण खरे प्रश्न मात्र अनुत्तरितच राहिले, अशी भावना नागरिकांमध्ये दिसून येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!