पुणे / प्रतिनिधी
राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा अधिकृत कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते निकालापर्यंत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ठरलेल्या वेळापत्रकानुसार पार पडणार आहे.
निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेनुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्यास शुक्रवार, दि. १६ जानेवारी २०२६ पासून प्रारंभ होणार असून अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस दि. २१ जानेवारी २०२६ असेल. प्राप्त अर्जांची छाननी दि. २२ जानेवारी २०२६ रोजी करण्यात येणार आहे.
उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत दि. २७ जानेवारी २०२६ असून याच दिवशी अधिकृत उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया बुधवार, दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडणार आहे.
मतदानानंतर मतमोजणी पूर्ण करून दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏

















