Homeक्राईमक्लासवरून परतणाऱ्या दहा वर्षीय अल्पवयीन मुलीला अडवून हात पकडला; प्रेमाची जबरदस्ती करणाऱ्या...

क्लासवरून परतणाऱ्या दहा वर्षीय अल्पवयीन मुलीला अडवून हात पकडला; प्रेमाची जबरदस्ती करणाऱ्या तरुणाविरुद्ध तक्रार

एक्झरबीया, हिंजवडी हिल्स फेज 2 ) सोसायटी नेरे दत्तवाडी परिसरातील धक्कादायक प्रकार; पाठलाग करून मोबाईल नंबर व ओळख मागितल्याचा आरोप

हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 16 मार्च 2026
हिंजवडी परिसरात एका 10 वर्षीय अल्पवयीन मुलीशी गैरकृत्य केल्याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात आरोपी संजय सिंग याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 74, 75 तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (POCSO) कायदा 2012 अंतर्गत कलम 8 आणि 11 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार 13 मार्च 2026 रोजी सायंकाळी सुमारे सवासहा ते सात वाजण्याच्या दरम्यान घडल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर 14 मार्च 2026 रोजी पहाटे 3.30 वाजता हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 155/2026 नोंदविण्यात आला.

ही घटना हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या ( एक्झरबीया, हिंजवडी हिल्स फेज 2 ) सोसायटी परिसरात घडल्याचे नमूद करण्यात आले आहे. पीडित अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

नेरे दत्तवाडी परिसरातील  ( एक्झरबीया, हिंजवडी हिल्स फेज 2  सोसायटी ) परिसरात क्लासवरून घरी परतणाऱ्या अल्पवयीन, पीडित मुलगी दररोज सायंकाळी क्लासला जात असते. दिनांक 13 मार्च 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6.15 वाजण्याच्या सुमारास ती क्लासवरून परतत असताना परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने तिचा पाठलाग करत अचानक तिचा हात पकडला.
त्यानंतर आरोपीने मुलीशी जबरदस्तीने संवाद साधण्याचा प्रयत्न करत “तू कुठे राहतेस, रोज क्लासला येतेस का, तुला चॉकलेट गिफ्ट देतो” अशा प्रकारची बोलणी करत तिच्यावर प्रेम करण्याचा दबाव टाकल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच मोबाईल नंबर मागत वारंवार ओळख वाढवण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
घटनेनंतर घाबरलेल्या अवस्थेत मुलगी घरी परतली. यानंतर कुटुंबीयांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संबंधित तरुण त्या परिसरात फिरताना दिसल्याचे समोर आले. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने हिंजवडी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली.
सदर प्रकरणी पोलिसांनी तक्रारीची नोंद घेत पुढील तपास सुरू केला असून आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
सध्या या प्रकरणाचा पुढील तपास हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश घाडगे  करीत असून, आरोपीबाबत अधिक माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!