पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live
मुंबई / पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live
हरीश शर्मा – मुख्य संपादक
महाराष्ट्र राज्यातील सर्व कॅब, टॅक्सी आणि रिक्षा चालकांनी ९ ऑक्टोबर २०२५ रोजी एकदिवसीय संपाचे आवाहन केले असून, हा बंद ठरल्याप्रमाणेच होणार असल्याची स्पष्ट घोषणा महाराष्ट्र कामगार सभा चे अध्यक्ष डॉ.केशव नाना क्षीरसागर यांनी केली आहे. काही माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर “काही संघटनांनी सरकारसोबत चर्चा करून बंद मागे घेतला” अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या जात असल्या तरी, या अफवांचा वास्तवाशी कोणताही संबंध नाही, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
डॉ.केशव क्षीरसागर यांचे म्हणणे आहे की, “शासनाने बेकायदेशीर प्रवासी वाहतूक कंपन्यांवर कारवाई करून त्यांच्या अँपमध्ये शासकीय दर लागू करावेत,” या प्रमुख मागणीसाठी हा एकदिवसीय बंद ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ९ ऑक्टोबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येत असल्यामुळे या आंदोलनाकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले जाणार आहे असे क्षीरसागर यांनी स्पष्ट केले आहे की, “सरकारसोबत मिळून काही संघटना आम्ही बंद मागे घेतला” अशा बातम्या खोट्या आहेत. “या स्वयंघोषित संघटनांना ना चालकांचा पाठिंबा आहे, ना त्यांनी आजवर चालकांच्या प्रश्नांवर एकही आंदोलन केले आहे,” असे संघटनांच्या प्रतिनिधींनी म्हटले आहे.
त्यांनी पुढे सांगितले की, “७ ऑक्टोबर रोजी परिवहन मंत्र्यांनी आमच्या मूळ संघटनेला न बोलावता काही स्वयंघोषित नेत्यांना मंत्रालयात बोलावले. त्यांच्या त्या चहा-पाण्याच्या मेजवानीची परतफेड म्हणूनच काहीजण माध्यमांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत.”
“आमच्या आंदोलनामुळे मंत्र्यांना मंत्रालयातून पळ काढावा लागला, त्यामुळे अशा अफवा पसरवून चालकांच्या एकतेला तडा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण ९ ऑक्टोबरचा आमचा बंद ठरल्याप्रमाणेच होणार आहे,” असा पुनरुच्चार संघटनांनी केला आहे.
संघटनांचा ठाम इशारा:
“९ ऑक्टोबरचा एकदिवसीय बंद कायम आहे. कोणताही बदल नाही. संभ्रम पसरवणाऱ्या संघटनांचा चालकांशी काहीही संबंध नाही. चालक बांधवांनी एकजुटीने आंदोलन यशस्वी करावे.”
📰 पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live
राज्यभरातील वाहतूक क्षेत्रातील सर्व घडामोडींसाठी आम्हाला फॉलो करा.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏














