पुणे पीसीएमसी न्यूज : खडकी –
वंदे मातरम संघटना, खडकी यांच्या वतीने शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचा भव्य सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला . या प्रसंगी आमदार शिरोळे यांनी भावनिक आश्वासन देत
“वंदे मातरम संघटनेने केलेले लोकाभिमुख काम पाहून मला नेहमी प्रेरणा आणि ऊर्जा मिळते. तुम्ही मला जसे सांगत जाल तसे मी समाजासाठी काम करत राहीन, ही माझी बांधिलकी आहे.” असे उदगार काढले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे प्रांत अध्यक्ष विकास हांडे, प्रांत कार्याध्यक्ष राजेश शर्मा, खडकी विभाग अध्यक्ष शिरीष रोच, भारतीय जनता पार्टी खडकी मंडल अध्यक्ष शाम कांची, मुकेश गवळी, डेव्हिड फ्रान्सिस, अजित पवार, धीरज गुप्ता, आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग पंच मनोहर ताथवडकर, नरेश लखन, देवेंद्र बिडलान आणि शरद रोच उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेश काकडे, आनंद रेड्डी, आशिष अग्रवाल, राजेश राजपूत, दीपक चार्य, करण चव्हाण, . योगेश आहेर, विकी सारसर, हरीश गडपल्लू यांनी विशेष परिश्रम घेतले.
- प्रस्तावना शिरीष रोच तर सूत्रसंचालन राजेश काकडे यांनी केले. या भव्य सोहळ्याला मोठ्या संख्येने मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏

















